108MP कॅमेरासह Samsung नवा स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 20, 2021 | 6:00 AM

Samsung A सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याचा विचार करत आहे. या मोबाईलचे नाव Samsung Galaxy A73 असेल. दरम्यान, या फोनचे काही फीचर्स लीक झाले आहेत.

108MP कॅमेरासह Samsung नवा स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Samsung New Phone

Follow us on

मुंबई : Samsung A सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याचा विचार करत आहे. या मोबाईलचे नाव Samsung Galaxy A73 असेल. दरम्यान, या फोनचे काही फीचर्स लीक झाले आहेत. हा फोन 108MP कॅमेरासह सादर होईल, असा दावा अनेक लीक्स आणि रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. (Samsung Galaxy A73 can launch with 108MP camera, specifications feature leaked ahead of launch)

लेट्सगो डिजिटलचा हवाला देऊन अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, रेंडर्स या फोनच्या बॅक-पॅनलवर क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम-पॉवर बटण देण्यात आले आहे. याच्या तळाशी सिम ट्रे आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. याआधी सप्टेंबरमध्ये एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की Samsung Galaxy A73 फोनमध्ये 108MP कॅमेरा दिला जाईल. तसेच या मोबाईलमध्ये मजबूत बॅटरीही दिली जाऊ शकते.

Samsung Galaxy A73 चा प्रोसेसर

इतर लीक रिपोर्ट्सबद्दल बोलायचे झाले तर सॅमसंग गॅलेक्सी A73 मध्ये स्नॅपड्रॅगन 750G चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच, या फोनमध्ये Android 12 आउट-ऑफ-द-बॉक्स OS उपलब्ध असेल. यासोबतच या मोबाईलमध्ये 5G कनेक्टिव्हिटीही उपलब्ध असेल. सॅमसंगचा हा आगामी फोन Samsung Galaxy A72 चे अपग्रेडेड मॉडेल असेल.

Samsung Galaxy A72 चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A72 मध्ये 6.7 इंचांचा फुल एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात 64MP प्रायमरी कॅमेरा आहे. 12MP अल्ट्रा वाइड अँगल शूटर, 5MP मॅक्रो शूटर आणि 8MP टेलिफोटो शूटर आहे. तसेच 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही मिळेल. फोनमध्ये Snapdragon 720G चिपसेट उपलब्ध असेल.

Samsung Galaxy A73 ची संभाव्य किंमत

हा सॅमसंग स्मार्टफोन 2022 च्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो आणि त्याची किंमत 25,000 ते 30,000 च्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. सध्या या फोनच्या लॉन्च किंवा किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(Samsung Galaxy A73 can launch with 108MP camera, specifications feature leaked ahead of launch)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI