AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOURISM | सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यावरचे वॉटर स्पोर्ट्स सुरु; पर्यटकांना लुटता येणार आनंद

मागील आठ महिन्यांपासून बंद असलेले समुद्र किनाऱ्यावरील सर्व वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्यात आले आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे.

TOURISM | सिंधुदुर्गातील समुद्रकिनाऱ्यावरचे वॉटर स्पोर्ट्स सुरु; पर्यटकांना लुटता येणार आनंद
| Updated on: Nov 20, 2020 | 6:55 PM
Share

सिंधुदुर्ग : मागील आठ महिन्यांपासून बंद असलेले समुद्र किनाऱ्यावरील सर्व वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येने अनेक पर्यटक भेट देतात. अनलॉक अंतर्गत वाहतूक व्यवस्था पूर्ववत होत असल्यामुळे वॉटर स्पोर्ट्सकडे पर्यकांचा ओढा सुरु झाला आहे. पर्यटकांचा हा प्रतिसाद लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे. (sea beaches of Sindhudurg are open for tourism, tourist have to follow the corona prevention guidelines)

पर्यटकांचा ओढा आणि अनलॉकची प्रक्रिया लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 आणि 30 तसेच महाराष्ट्र कोव्हिड-19 उपाययोजना नियम 2020 मधील नियम 10 अन्वये हा निर्णय घेण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला विसृत समुद्रकिनारा लाभलेला आहे. या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी बोटिंग, एटीव्ही रायव्हींगसोबतच विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्टची व्यवस्था आहे. त्यामुळे दरवर्षी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचा मोठा असतो. मात्र,कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील आठ महिन्यांपासून येथील सर्व प्रकारचे खेळ बंद होते. वाहतूक व्यवस्थादेखील नसल्यामुळे पर्यटकांची संध्यादेखील नगण्य झाली होती. पण, अनलॉक अंतर्गत राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आल्याने विविध वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक पुन्हा या समुद्र किनाऱ्याकडे येऊ लागले आहेत.

दरम्यान, समुद्र किनाऱ्यावरली सर्व वॉटर स्पोर्ट्स सुरु झाले असले तरी पर्यटकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक आहे. पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर येताना शारीरिक अंतर पाळणे, मास्क घालणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच, या नियमांचे उल्लंघन करताना आढळ्यास पर्यटकांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

गोंदिया जिल्ह्यीतील ताडोबा व्याघ्र प्रकल्प 1 नोव्हेंबरपासून सुरु

कोरोना विषाणूमुळे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 30 जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.  1 नोव्हेंबरपासून व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन पुन्हा सुरु झाले आहे. मात्र केवळ 50 टक्के पर्यटकांनाच वाहनात प्रवेश दिला जात आहे आहे. (sea beaches of Sindhudurg are open for tourism, tourist have to follow the corona prevention guidelines)

संबंधित बातम्या :

टुरिस्ट गाईडवर भूकबळीची वेळ, वेरुळ-अजिंठ्यासह राज्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याच्या मागणीवर अदिती तटकरे म्हणतात…

महाराष्ट्राचं मिनी काश्मीर खुलं, महाबळेश्वरमध्ये पर्यटनाला सशर्त परवानगी

ताडोबापाठोपाठ नवेगाव व्याघ्र पर्यटन 1 नोव्हेंबरपासून सुरु, केवळ 50 टक्के पर्यटकांना वाहनात प्रवेश

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.