शिर्डीत साईमंदिराजवळ व्यावसायिकाची आत्महत्या, स्वत: च्या दुकानातच गळफास

शिर्डीत एका 55 वर्षीय व्यावसायिकाने स्वत:च्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली (Shirdi Shop Owner Suicide) आहे.

शिर्डीत साईमंदिराजवळ व्यावसायिकाची आत्महत्या, स्वत: च्या दुकानातच गळफास
Namrata Patil

|

Jun 24, 2020 | 9:06 PM

अहमदनगर : शिर्डीत एका 55 वर्षीय व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीराम चुटके असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या व्यावसायिकाचे दुकान अहमदनगर-मनमाड महामार्गावर साईमंदिराजवळ आहे. स्वत:च्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Shirdi Shop Owner Suicide in own shop)

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5 वाजता श्रीराम चुटके (55) या व्यापाऱ्याने आत्महत्या केली. त्यांचे दुकान नगर – मनमाड महामार्गावर हॉटेल सिद्धांतजवळ आहे. श्रीराम चुटके यांचे जनरल स्टोअर्स आणि कोल्ड्रिंक्सचे दुकान आहे. याच दुकानातील फॅनला दोरी बांधून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

कर्ज आणि त्यातच कोरोनाच्या संकटकाळात व्यवसाय ठप्प असल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र पोलीस तपासानंतर याबाबतचं नेमकं कारण पुढे येईल असे सांगितलं जात आहे.

शिर्डीतील साईमंदिर 17 मार्चपासून बंद असल्याने संपूर्ण अर्थकारण ठप्प आहे. लॉकडाऊनच्या दीर्घ कालावधीनंतर अनलॉक होऊनही मंदिर बंद आहे. त्यामुळे शिर्डीत भाविकही येत नाहीत. त्यामुळे अनेक व्यवसाय अडचणीत सापडेल आहेत. अनेकांचा रोजगार बुडाला आहे. कर्ज, हप्ते, घरखर्च अशा एक ना अनेक समस्या त्यांच्यासमोर उभ्या आहेत. अशाच नैराश्याचा हा बळी तर नाही ना असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे. (Shirdi Shop Owner Suicide)

संबंधित बातम्या : 

बायकोची आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी नवऱ्याचीही चितेत उडी, वाचवलेल्या नवऱ्याने पुन्हा विहिरीत जीव दिला

Pune Suicide | मुलावर उपचार, पुण्यात रुग्णालयाच्या गच्चीवरुन आईची आत्महत्या

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें