AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 20,420 मध्ये 12 दिवस फिरा दक्षिण भारत ! IRCTC घेऊन येत आहे खास पॅकेज

वीन वर्षात दक्षिण भारत फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर IRCTC ने तुमच्यासाठी खास संधी आणली आहे. या टूरमध्ये कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आणि मंदिरांना भेट देता येणार आहे.

| Updated on: Nov 20, 2026 | 2:08 PM
Share
ही 12 दिवसांची टूर 18 जानेवारी 2027 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होईल. 29 जानेवारी 2027 रोजी प्रवास संपेल. ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, मिरज आणि बेळगाव येथूनही ट्रेनमध्ये चढता येईल.

1 / 6
गोकर्ण येथील प्रसिद्ध महाबळेश्वर मंदिराचे दर्शन घेता येईल. ओम बीचवर निसर्गाचा आनंद घेता येईल. मुरुडेश्वर येथील भव्य शिवमंदिर आणि समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अनुभवता येईल. केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिराला भेट देता येईल. रामेश्वरमच्या प्रवासादरम्यान समुद्रावरील ऐतिहासिक पंबन पुलाचे नयनरम्य दृश्य पाहता येईल.मदुराई येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिराचे दर्शन घेता येईल. कन्याकुमारी येथे कुमारी अम्मन मंदिर, विवेकानंद रॉक मेमोरियल आणि गांधी मंडपम पाहता येईल. तसेच कन्याकुमारीमधील सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेता येईल.

2 / 6
त्रिची आणि तंजावर येथील ऐतिहासिक मंदिरांना भेट दिली जाईल. कांचीपुरममधील कामाक्षी अम्मन, एकाम्बरेश्वर आणि श्री वरदराजा पेरुमल मंदिरांचे दर्शन होईल. महाबलीपुरममधील प्रसिद्ध शोर मंदिर आणि कृष्णाज बटरबॉल पाहण्याची संधी मिळेल.

3 / 6
रेल्वेने प्रत्येकाच्या बजेटनुसार तीन स्वतंत्र श्रेणी तयार केल्या आहेत. स्लीपर क्लास (इकॉनॉमी): प्रति व्यक्ती ₹२०,४२०,३एसी (स्टँडर्ड): प्रति व्यक्ती ₹३२,७७०, २एसी (कम्फर्ट): प्रति व्यक्ती ₹४२,९४०,  ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी स्वतंत्र भाडे आकारले जाते, ज्याची सुरुवात ₹१९,०१० पासून होते.

4 / 6
पॅकेजमध्ये रेल्वे प्रवास, शाकाहारी जेवण, हॉटेलमधील मुक्काम, स्थानिक बस प्रवास, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि करांचा समावेश आहे. भारत गौरव योजनेअंतर्गत सुमारे 33% सवलत भाड्यात समाविष्ट आहे. स्मारकांचे प्रवेश शुल्क, बोटिंग, गाइड फी, रूम सर्व्हिस आणि वैयक्तिक खर्च मात्र स्वतः करावे लागतील.

5 / 6
धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वास्तूंचा आनंद एकाच प्रवासात घेण्याची ही उत्तम संधी आहे. फक्त ₹20,420 पासून सुरू होणाऱ्या या 12 दिवसांच्या टूरमुळे दक्षिण भारताची सफर बजेटमध्ये करता येऊ शकते!

6 / 6
Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर