बहिणीला टीमची जबाबदारी ते हॉलिवूड पदार्पण, सुशांतच्या डायरीत 2020 चे प्लानिंग

सुशांतच्या डायरीत बहीण प्रियांकाचाही उल्लेख आहे. प्रियंका सुशांतच्या टीमला हॅंडल करेल असे त्याने डायरीत लिहिले आहे.

बहिणीला टीमची जबाबदारी ते हॉलिवूड पदार्पण, सुशांतच्या डायरीत 2020 चे प्लानिंग
अनिश बेंद्रे

|

Aug 13, 2020 | 9:38 AM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. सुशांतच्या मृत्यूला 59 दिवस उलटले असताना सुशांतच्या डायरीतील 15 पाने समोर आली आहेत. यामध्ये सुशांतने हॉलिवूड पदार्पणापासून कंपनीच्या भविष्यातील वाटचालींचे नियोजन केल्याचे दिसत आहे. (Sushant Singh Rajput Diary Pages shows his dreams and planning)

सुशांतच्या डायरीत बहीण प्रियांकाचाही उल्लेख आहे. प्रियंका सुशांतच्या टीमला हॅंडल करेल असे त्याने डायरीत लिहिले आहे. आपली अभिनय कारकीर्द सावरण्यासाठी काय करता येईल, याबाबतही सुशांतने विचार करुन ठेवला होता. यामध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात, याचाही त्याने विचार केला होता.

एखादा सीन उठावदार होण्यासाठी कोणता प्रयोग आणि कोणती पद्धत वापरली पाहिजे, त्याची तयारी कशी करावी, याविषयी सुशांतने लिहिले आहे. आपली वाक्य पाठ करु नका, ती फील करा आणि नंतर कॅमेर्‍यासमोर म्हणा, असेही त्याने लिहिले आहे.

हेही वाचा : युरोप टूरवर हॉटेलमध्ये भूत दिसल्याने सुशांतचा थरकाप, इटलीहून अर्ध्यावर परतलो, रियाचा दावा

सुशांत चांगल्या लेखकांच्या माध्यमातून चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होता. त्यामुळेच तो आपली टीम बनवण्यासोबतच लेखकांची लीग तयार करण्याच्याही विचारात होता. जेणेकरुन चांगले लेखन करणारे पटकथाकार आणि त्यांच्या स्क्रिप्ट कोणालाही उपलब्ध होतील.

हॉलिवूडमध्ये काम, स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, कंपनीत कुटुंबातील कोणत्या सदस्याला काय जबाबदारी द्यायची, कंपनीला कोणत्या शिखरावर न्यायचं, याबाबतही त्याचे नियोजन असल्याचे दिसते. (Sushant Singh Rajput Diary Pages shows his dreams and planning)

युरोप टूरवर असताना सुशांतला हॉटेलमध्ये भूत दिसलं होतं आणि त्यानंतरच सुशांत नैराश्यात गेला, असा धक्कादायक दावा सुशांतची मैत्रिण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केला होता. मुंबई पोलिसांना रियाने दिलेल्या जबाबातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये रिया, सुशांत आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती युरोपला गेले होते, त्यावेळी ही घटना घडल्याचं रियाने सांगितलं.

संबंधित बातम्या :

बिहार निवडणुकांमुळे सुशांतच्या मृत्यूचे राजकारण, महाराष्ट्राचा दावा, तिवारी क्वारंटाईन प्रकरणही गाजले, सुप्रीम कोर्टात काय काय झाले?

तू माझ्याशी का बोलली नाहीस? सुशांतच्या वडिलांचा रियाला मेसेज

(Sushant Singh Rajput Diary Pages shows his dreams and planning)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें