टीव्हीवर सुजीतचं बचावकार्य पाहताना चिमुकलीचा टबमध्ये बुडून मृत्यू

टीव्हीवर सुजीतचं बचावकार्य पाहताना चिमुकलीचा टबमध्ये बुडून मृत्यू
डावीकडे सुजित, उजवीकडे रेवती संजना

तामिळनाडूतील तुतिकोरिनमध्ये राहणारं एक कुटुंब सुजीतच्या बचावकार्याची बातमी टीव्हीवर पाहण्यात गुंग होतं. त्यावेळी त्यांच्या मुलीचा टबमध्ये बुडून मृत्यू झाला

अनिश बेंद्रे

|

Oct 30, 2019 | 3:10 PM

चेन्नई : तामिळनाडूत 70 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्या सुजीतचा मृत्यू झाला, तर त्याच वेळी तुतिकोरिनमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीला बाथरुममधील टबमध्ये बुडून प्राण गमवावे लागले. दुर्दैवी योगायोग म्हणजे सुजीतच्या बचावकार्याची बातमी टीव्हीवर पाहण्यात चिमुकलीचं कुटुंब गुंग असल्याने झालेली निष्काळजी तिच्या जीवावर (Girl dies while watching Operation Sujith) बेतली.

तामिळनाडूमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या सुजीत विल्सनला वाचवण्यासाठी तीन दिवस प्रयत्न सुरु होते. मात्र त्याचा जीव वाचवण्यात प्रशासनाला अपयश आलं. शोकाकुल वातावरणात सुजीतला अखेरचा निरोप देण्यात आला.

तामिळनाडूतील तुतिकोरिनमध्ये राहणारं एक कुटुंब सुजीतच्या बचावकार्याची बातमी टीव्हीवर पाहण्यात गुंग होतं. त्यावेळी घरातली चिमुकली रेवती संजना बाथरुमजवळ खेळत होती. कुटुंब टीव्ही पाहण्यात मग्न असताना ती खेळत खेळत पाण्याच्या टबजवळ गेली आणि डोकावून पाहताना आत पडली. यामध्ये तिचा जागीच बुडून मृत्यू झाला.

तुतिकोरिनमधील थरेसपुरम गावात सोमवारी रात्री ही घटना घडली. रेवती दिसत नसल्याचं कुटुंबाच्या लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. शोधाशोध करताना त्यांनी बाथरुममध्ये पाहिलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण चिमुकली पाण्याच्या टबमध्ये बुडाली होती. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी रेवती संजना हिला मृत घोषित (Girl dies while watching Operation Sujith) केलं.

बोअरवेलमध्ये अडकलेल्या सुजीतचा मृत्यू

तामिळनाडूतील त्रिची जिल्ह्यात तब्बल 3 दिवस बोरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षीय सुजीत विल्सनचा मृत्यू झाला. त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. मात्र अखेर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

यूट्यूब व्हिडीओतून धडे, एमबीए तरुणाची महाविद्यालयीन गर्लफ्रेण्डसोबत घरफोडी

बोरवेलमध्ये पडल्यानंतर बऱ्याच वेळाने सुजीत बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला बाहेर काढणं कठीण जात होतं. त्याचा श्वास सुरु होता पण 26 फुटांवरुन घसरुन तो 70 फूट खाली गेल्यानंतर त्याचा बचाव करणं अवघड झालं. मुलाला वाचवण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि राज्य पोलिस आणि स्थानिक प्रशासनासह अनेक पथकं काम करत होती.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें