Corona Virus : 700 वर्षानंतर जेरुसलेममधलं चर्च बंद, कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona ten Interesting things).

Corona Virus : 700 वर्षानंतर जेरुसलेममधलं चर्च बंद, कोरोनामुळे 'हे' पहिल्यांदाच घडतंय

मुंबई : भारतात सातत्याने कोरोना विषाणुच्या संसर्गाची आकडेवारी वाढत आहेत. तसेच मृत्यूंचीही संख्या वाढते आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजवणी सुरु आहे (Things happening first time in India due to corona). जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषयक आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात कधीही न घडलेल्या गोष्टी होत असल्याचं पाहायला मिळत आहे (Corona ten Interesting things).

1.राजस्थानमधील भिलवाडा हे ठिकाण कोरोना संसर्ग आटोक्यात आणणारं देशातलं पहिलं रोल मॉडेल ठरलंय. 30 मार्चपासून आजपर्यंत इथं एकही नवीन कोरोना रुग्ण सापडलेला नाही. भिलवाडा हे भारतातलं कोरोनाचं पहिलं केंद्र बनलं होतं. इथं खासगी दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टरलाच कोरोना झाला होता. त्याच्याकडून अनेकांना कोरोनाची लागण झाली. मात्र कठोर नियम, त्या नियमांची अंमलबजावणी आणि आरोग्य यंत्रणेची मेहनत यामुळे भिलवाडानं कोरोनाला नियंत्रणात आणलं आहे.

2. लॉकडाऊन तोडून न्यूझीलंडमध्ये खुद्द आरोग्यमंत्रीच कुटुंबासोबत फिरायला बाहेर पडल्याचं समोर आलंय. ते घरापासून 20 किलोमीटरवरच्या एका बीचवर आपल्या कुटुंबाला घेऊन गेले होते. त्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी आरोग्यमंत्र्यांचे बरेचसे अधिकार काढून घेतले आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर आरोग्यमंत्री डेविड क्लार्क यांनी राजीनामा देण्याचीही तयारी दाखवली होती. मात्र, अशा संकट काळात कोणत्याही मंत्र्याला राजीनामा देता येणार नाही, असं उत्तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैकिंडा अर्डन यांनी दिलंय.

3. रशियाच्या मॉस्कोमध्ये रस्ते, इमारती, बस स्टॉप अशा अनेक वस्तू 100 टक्के सॅनिटाईज केल्या जात आहेत. रशियात आतापर्यंत 7 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. येथे एकूण 58 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. लॉकडाऊन करण्यासोबतच रशियाच्या स्थानिक प्रशासनानं सार्वजनिक ठिकाणं सॅनिटाईज करण्यावर सर्वाधिक भर दिलाय.

4. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांसाठी स्वतंत्र दफनभूमी तयार केली गेलीय. साओ पॉलो या शहरात याची भयावह दृश्यं पाहायला मिळत आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात दफनभूमीचं काम हाती घ्यावं लागण्याची ही या देशावरची पहिलीच वेळ आहे. एका माहितीनुसार ब्राझिलमध्ये एकाच दिवशी 300 हून अधिक मृत्यू झाले. तर 24 तासात 4 हजारांहून जास्त रुग्ण सुद्धा सापडले आहेत.

5. जिथून कोरोना पसरला तो चीन मात्र हळूहळू पूर्वपदावर आलाय. शांघाय इथलं एक पार्क नुकतंच सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं. कोरोनाच्या फैलावानंतर पहिल्यांदाच या बगिच्यात मोठ्या संख्येनं लोक जमली होती. जगभरातली सर्व प्रमुख शहरं बंद असताना चीनमधली बिजिंग आणि शांघाय दोन्ही मोठी शहरं मात्र सुरु आहेत. तिथलं जनजीवन सुद्धा आता हळूहळू पूर्वीसारखं होऊ लागलंय.

6. लोकांना घरी राहा असं आवाहन करणारा एक बलून बॉयचा व्हिडीओ व्हायरल झालाय. एका बलूनमध्ये हा व्यक्ती रस्त्यांवर फिरुन लोकांना घरात थांबण्याचं आवाहन करतोय. ट्विटरवर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर झालाय. मात्र हा व्हिडीओ नेमक्या कुठल्या देशाचा आहे, हे अद्याप कळालेलं नाहीय.

7. कोरोनामुळे 700 वर्षानंतर पहिल्यांदा जेरुसलेममधलं पवित्र मानलं जाणारं चर्च बंद करण्यात आलं आहे. भगवान येशूला याच ठिकाणी दफन केलं गेलं होतं. याआधी प्लेगच्या साथीदरम्यान हे चर्च बंद करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र बाराव्या शतकानंतर आता पहिल्यांदाच या चर्चला कुलूप लावण्यात आलंय.

8. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच जपानमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. जपानची राजधानी टोकियोसह इतर 5 राज्यांमध्ये ही आणीबाणी लागू असेल. जपानमध्ये मागच्या 2 आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र आता तिथं सुद्धा कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढ होतेय. त्यापार्श्वभूमीवर आणीबाणीचा निर्णय घेतला आहे. सध्या जपानमध्ये 3900 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

9. चीनमध्ये 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. जानेवारी महिन्यानंतर पहिल्यांदाच एक दिवसात एकही मृत्यू न होण्याची चीनमधली ही पहिली घटना आहे. चीनच्या माध्यमांच्या दाव्यानुसार 15 मार्चनंतरच नवे रुग्ण आणि कोरोनामुळे मृतांची संख्या यांच्यात वेगानं घट झालीय. मात्र चीनमधील परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरही तिथं नवे 32 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या चीनमध्ये 81 हजार 740 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी 77 हजार रुग्ण बरे झाल्याचा दावा चीन सरकारचा आहे.

10. फक्त 3 महिन्यात कोरोनानं जगभरातल्या 200 देशांमध्ये आपले पाय पसरले आहेत. मागच्या महिन्यात कोरोना 180 देशापर्यंत पसरला होता. मात्र आता इतर अनेक देशांमध्येही कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. फक्त जे देश कमी लोकसंख्येचे आहेत किंवा जे देश बेटांवर आहेत तेच देश अद्याप कोरोनाच्या फैलावापासून वाचू शकले आहेत.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी

दारुऐवजी सॅनिटायझरची निर्मिती, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

Corona Virus : न्यूझीलंडमध्ये सलग दुसऱ्यांदा आणीबाणीच्या कालावधीत वाढ, कोरोनामुळे जगात ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI