Food | मेंदूवरचा ताण कमी करा, ‘या’ भाज्या खा आणि स्मरण शक्ती वाढवा!

आपल्या आहारातील काही पदार्थ आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

Food | मेंदूवरचा ताण कमी करा, ‘या’ भाज्या खा आणि स्मरण शक्ती वाढवा!

मुंबई : निरोगी आणि पौष्टिक आहार घेतल्याने केवळ शरीरच निरोगी ठेवता येते असे नाही तर, यामुळे आपण बर्‍याच आजारांपासून देखील दूर राहू शकतो. याची कल्पना आपल्यापैकी बऱ्याच जणांना असावी. अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टी इथे तिथे ठेवून विसरतो. बऱ्याच वेळा गॅसची फ्लेम बंद करणे किंवा घरातील एखादी वस्तू कुठल्याही जागी ठेवून ती विसरून जाणे, अशा अनेक गोष्टी आपण रोज विसरत असतो. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्यात आपली समरन शक्ती खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आपला आहार आपल्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आपल्या आहारातील काही पदार्थ आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. शिवाय अल्झायमर आणि डिमेंशियासारख्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात. (Vegetables help in boosting memory)

 

  • पालक

हिरव्या भाज्या आपली स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पालकात भरपूर प्रमाणात फोलेट, व्हिटॅमिन के, ई असते. हे घटक आपल्या मेंदूला चालना देण्याचे काम करतात. या व्यतिरिक्त आपण आपल्या आहारात कोबी, कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा लेट्युस या हिरव्या भाज्या समाविष्ट करू शकता. (Vegetables help in boosting memory)

 

  • टोमॅटो

टोमॅटो केवळ एक रसाळ आणि चवदार भाजी नाही, तर स्मरणशक्ती वाढविण्यासाठीच्या देखील खूप महत्त्वाचा घटक आहे. फोर्ब्सच्या संशोधनानुसार टोमॅटोमध्ये लाइकोपीनचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या शरीरात अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते. टोमॅटो आपल्या पेशींना दुषित होण्यापासून वाचवतो. तसेच आपली स्मरणशक्ती वाढविण्यासही मदत करतो. टोमॅटो जवळजवळ सर्व भाज्या बनवताना वापरला जातो. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तो कच्चा देखील खाऊ शकता.(Vegetables help in boosting memory)

 

  • ब्रोकोली

हिरव्या फ्लॉवर प्रमाणे दिसणारा ब्रोकोली आपली स्मरणशक्ती सुधारून, ती वाढवण्यास मदत करतो. त्यात व्हिटॅमिन के आणि कोलीन सारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे आपला बुद्धी तीक्ष्ण होते. ब्रोकोलीचा  आपल्या आहारात नियमित समावेश केल्यास आपल्या स्मरण शक्तीत वाढ होईलच. परंतु, अकाली येणारे वृद्धत्व देखील प्रतिबंधित होईल.

 

  • बेल पेपर अर्थात शिमला मिरची

आपल्या अन्ना पदार्थाला वेगवेगळे रंग देणाऱ्या लाल आणि पिवळ्या रंगाच्या बेल पेपर अर्थात शिमला मिरची देखील स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. विशेषत: लाल बेल पेपरमध्ये आढळणारे व्हिटॅमिन बी 6 आपल्या मेंदूची गती वाढविण्यास मदत करते. यासह ते प्रथिनांचे उर्जेमध्ये रूपांतरित करण्याचे काम देखील करते. पास्ता, कोशिंबीर आणि सूपमध्ये आपण या रंगबेरंगी बेल पेपर म्हणजेच शिमला मिरची वापरू शकता.(Vegetables help in boosting memory)

 

  • बीट

हिवाळ्याच्या मोसमात बीट खाणे शरीरासाठी फायदेकारक ठरते. हिमोग्लोबिनची कमी असणाऱ्या लोकांना  बीटचा रस पिण्यास सांगितले जाते. याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. बीट स्मरणशक्ती वाढण्यासही मदत करतो. विशेषत: लहान मुले आणि वृद्ध लोक, जे आहारात नेमक्याच गोष्टी खातात त्यांनी डाएटमध्ये बीटाचा समावेश नक्की केला पाहिजे. (Vegetables help in boosting memory)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI