भारत दौऱ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘बाहुबली अवतार’, व्हिडीओ व्हायरल

डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल होण्याच्या आधीच त्यांचा बाहुबली अवतार सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

भारत दौऱ्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘बाहुबली अवतार’, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी (24 फेब्रुवारी) भारत दौऱ्यावर येत आहेत. मात्र, ते भारतात दाखल होण्याच्या आधीच त्यांचा बाहुबली अवतार सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे (Donald Trump in Bahubali Avtar). या व्हिडीओमध्ये बाहुबली चित्रपटाच्या काही दृश्यांमध्ये एडिटींग करुन बाहुबलीच्या जागेवर ट्रम्प यांचा चेहरा लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनीच हा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडेलवरुन शेअर केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी संबंधित एडिटेड व्हिडीओ रिट्वीट करत भारतातील सर्वात चांगल्या मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं. या व्हिडीओमध्ये इवांका ट्रम्प, मेलानिया ट्रम्प आणि ट्रम्प जूनियर यांनाही दाखवण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या पत्नी जसोदाबेन यांनाही दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओच्या माध्यामातून भारत आणि अमेरिकेची मैत्री दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


मोटेरा स्टेडिअममध्ये “नमस्ते ट्रम्प कार्यक्रम”

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारतात जोरदार तयारी सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत 24 फेब्रुवारीला भारतात येत आहेत. भारतात आल्यानंतर त्यांचं मोटेरा स्टेडिअमवर स्वागत करण्यात येईल. त्यासाठी नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानंतर ते आग्रा येथील ताजमहल पाहण्यासाठी जातील. ते 25 फेब्रुवारीला भारतातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.

Donald Trump in Bahubali Avtar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI