जगातील सर्वात घातक गोलंदाज कोण? शोएब अख्तरने घेतलं भारतीय खेळाडूचं नाव

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने एका भारतीय गोलंदाजाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

जगातील सर्वात घातक गोलंदाज कोण? शोएब अख्तरने घेतलं भारतीय खेळाडूचं नाव

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) कधी भारतीय खेळाडूंचं तोंडभरुन कौतुक करतो तर कधी भारतीय खेळांडूंविरोधात, भारताविरोधात गरळ ओकतो. कधी सचिन तेंडुलकर तर कधी महेंद्रसिंह धोनीचं कौतुक करणाऱ्या शोएबने काही दिवसांपूर्वी आधी काश्मीर (Kashmir) काबीज करु आणि त्यांनंतर भारतावर हल्ला करु असं धक्कादायक विधान केलं होतं. त्यानंतर त्याच्यावर देशभरातून टीका झाली. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ 36 धावांवर ऑल आऊट झाला, तेव्हाही त्याने भारतीय टीमला लक्ष्य केले होते. दरम्यान आता शोएब अख्तरने एका भारतीय गोलंदाजाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. (Who is the worlds Deadliest fast bowler Shoaib Akhtar named this indian bowler)

शोएब अख्तर म्हणाला की, सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह हा सर्वोत्तम आणि सर्वात घातक गोलंदाज आहे. दरम्यान, अख्तरने पाकिस्तानचा मोहम्मद आमिर बुमराहच्या बरोबरीचा गोलंदाज असल्याचा दावा केला आहे.

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोऱ्यात जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या सर्वोत्तम गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. मेलबर्न कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज स्टीव्ह स्मिथला ज्या प्रकारे त्रिफळाचित (बोल्ड आऊट) केलं ते पाहून अनेकांनी बुमराहचं कौतुक केलं. मागील दोन कसोटी सामन्यांमध्ये बुमराने 8 विकेट मिळवल्या आहेत.

स्पोर्ट्स टुडेशी बोलताना अख्तर म्हणाला की, माझ्या मते तो सर्वात स्मार्ट जलदगती गोलंदाज आहे. माझ्यासाठी बुमराह आणि मोहम्मद आमिर हे दोघेजण वसीम अक्रमपेक्षाही जबरदस्त गोलंदाज आहेत. मोहम्मद आसिफदेखील काही कमी नाही. हे असे गोलंदाज आहेत जे भल्या-भल्या मातब्बर फलंदाजांना रडवतात. एशियन चॅम्पियनशिपमध्ये आसिफसमोर एबी डिव्हिलियर्स रडत होता.

आसिफनंतर सध्या जागतिक क्रिकेटमध्ये बुमराह सर्वात दमदार गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अनेकजण बुमराहच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त करत होते. परंतु त्याच्याकडे जलद बाऊन्सर टाकण्याची क्षमता आहे. त्याची गोलंदाजी खूपच शार्प आहे. आणि विशेष म्हणजे तो एक चांगला मुलगा आहे.

हेही वाचा

आयत्या बिळावर नागोबा, रवी शास्त्रींनी अजिंक्य रहाणेचं मेलबर्न कसोटी विजयाचं क्रेडिट हिरावलं?

इंजिन स्टार्ट, रोहित शर्माची सिडनी कसोटीसाठी तयारी सुरु!

शोएब अख्तर यांनी त्यांचा देश सांभाळावा; काश्मीरबाबतच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी फटकारले

(Who is the worlds Deadliest fast bowler Shoaib Akhtar named this indian bowler)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI