AC मध्ये Auto Cut होत नाहीये? जाणून घ्या कारणं, उपाय आणि वीज बचतीचे स्मार्ट ट्रिक्स
ऑटो कट फिचर काम न करणं ही एक सामान्य पण दुर्लक्षित समस्या असू शकते. ही वेळेवर ओळखून योग्य उपाय केल्यास वीज बचतीसोबतच AC ची लाइफ देखील वाढवता येते. जर तुमच्या AC मध्ये ही अडचण जाणवली, तर हे उपाय अमलात आणा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसी (AC) म्हणजेच एअर कंडिशनर ही एक आवश्यक सुविधा झाली आहे. घर असो वा कार्यालय, एसीशिवाय आराम मिळणं कठीणच वाटतं. मात्र, त्यात एखादी छोटीशी तांत्रिक समस्या आली तरी ती मोठा त्रास देऊ शकते. अशीच एक सामान्य पण महत्वाची समस्या म्हणजे “ऑटो कट” न होणं. पण नेमकं हे ऑटो कट म्हणजे काय? ते एसीमध्ये कसं काम करतं आणि ते बंद झालं तर याचा परिणाम काय होतो? हे सर्व समजून घेणं गरजेचं आहे,
ऑटो कट म्हणजे काय?
ऑटो कट म्हणजे ACमधील एक तांत्रिक यंत्रणा जी थर्मोस्टॅट आणि टेम्परेचर सेंसरच्या साहाय्याने कार्य करते. तुम्ही जेव्हा AC चे तापमान 24°C किंवा 26°C वर सेट करता, तेव्हा थर्मोस्टॅट सतत त्या तापमानाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो. एकदा का खोलीचे तापमान सेट केलेल्या पातळीवर पोहोचते, तेव्हा कंप्रेसर आपोआप बंद होतो. यामुळे मशीनवर ताण येत नाही आणि वीजेची बचत होते. हा फंक्शन जर नीट काम करत नसेल, तर AC सतत चालू राहतो, ज्यामुळे वीज बिल वाढते आणि यंत्रणेवरही ताण येतो.
ऑटो कट न होण्यामागची कारणं
- * सेन्सरची बिघाड : जर टेम्परेचर सेन्सर नीट काम करत नसेल, तर थर्मोस्टॅटला योग्य सिग्नल मिळत नाही, आणि कंप्रेसर सतत चालू राहतो.
- * थर्मोस्टॅट बिघडलेला : खराब थर्मोस्टॅटमुळे AC ला माहितीच मिळत नाही की ते कधी थांबवायचं.
- * गॅसची कमतरता : कूलिंग गॅस (Refrigerant) कमी असेल तर योग्य थंडावा निर्माण होत नाही आणि Auto Cut होत नाही.
- * गंदे फिल्टर आणि फिन्स : फिल्टर गंजले असल्यास कूलिंग कमी होते आणि ऑटो कट सक्रिय होत नाही.
- * थर्मोस्टॅटची चुकीची जागा : जर थर्मोस्टॅट बल्ब, सूर्यप्रकाश अशा उष्ण जागी असेल, तर तापमान अचूकपणे मोजता येत नाही.
समस्या ओळखायची कशी?
जर AC सतत चालू राहत असेल, खोली फारच थंड वाटत असेल, कंप्रेसर सतत चालत असेल आणि वीज बिल अचानक वाढलं असेल, तर लक्षात घ्या की ऑटो कटबंद पडलंय!
उपाय काय?
1. 16°से पेक्षा कमी टेम्परेचर ठेवू नका, 24°से ठेवल्यास ऑटो कट लवकर काम करतो.
2. Thermostat कोरड्या कपड्याने स्वच्छ करा आणि पुन्हा तपासा.
3. दर 10-15 दिवसांनी फिल्टर काढून धुवा.
4. कूलिंग कमी वाटत असेल तर सर्विसिंगवाल्यांकडून गॅस चेक करून घ्या.
5. वरील उपायांनी फरक न पडल्यास, हे उपकरण त्वरीत बदला.
चांगल्या परफॉर्मन्ससाठी टिप्स
1. AC फक्त बंद खोलीत वापरा.
2. थेट सूर्यप्रकाश किंवा बल्बाजवळ थर्मोस्टॅट न लावा.
3. दर सहा महिन्यांनी प्रोफेशनल सर्विसिंग करा.
4. तापमान खूप कमी करू नका, यामुळे ऑटो कट उशिरा लागतो.
