मुलीला सेक्स टॉय गिफ्ट द्यायचं अभिनेत्रीच्या मनात आलं, असं करणं किती योग्य? तज्ज्ञ काय सांगतात? ती गोष्ट…
Can Sex Toys Affect Reproductive Health : अभिनेत्री गौतमी कपूरने सेक्स टॉईजसंदर्भात केलेल्या विधानानंतर, टीनएजर्सना या गोष्टी देणे योग्य आहे का यावर वाद सुरू झाला आहे. याबद्दल डॉक्टरस्, तज्ज्ञ काय सांगतात, ते जाणून घेऊया.

Are Sex Toy Safe for Health : अभिनेत्री गौतमी कपूर (Gautami Kapoor) ही अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यापूर्वीचा तिचा एक इंटरव्ह्यू पुन्हा व्हायरल झाला असून, त्यामुळे सोशल मीडियावर भूकंप आला होता. अभिनेत्री म्हणाली होती की, तिने तिच्या मुलीला तिच्या 16 व्या वाढदिवशी सेक्स टॉय किंवा व्हायब्रेटर (Vibrator) भेट देण्याचा विचार केला होता. भारतीय समाजात बहुतांश पालक हे आपल्या मुलांशी सेक्स, किंवा शारीरिक संबंधांविषयी बोलत नाहीत. अशा परिस्तिती अभिनेत्री गौतमीने केलेल्या या विधामुळे बरेच लोक भडकले होते, तर काहींनी तिचं कौतुकही केलं. देशात मोठ्या संख्येने टीनएजर्स आणि तरूण लोकं सेक्स टॉईज वापरत असता. मात्र या गोष्टी रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न उपस्थि होतो. याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात, ते जाणून घेऊया.
तज्ज्ञ गायनोकॉलॉजिस्ट यांच्या सांगण्यानुसार, आता जग, काळ खूप बदलला आहे आणि लोक सेक्सबाबत नवीन गोष्टी वापरून पाहत आहेत. आजकाल मोठ्या संख्येने तरुण सेक्स टॉय वापरत आहेत. या गोष्टी रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी (प्रजनन आरोग्यासाठी) वाईट नाहीत, परंतु त्यांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे आणि व्यसन लागू देणं टाळले पाहिजे. तरुण मुले आणि मुली सेक्स टॉईजचा आनंद घेत आहेत आणि लैंगिक संबंधांबद्दल जागरूक होत आहेत. अनेक वैद्यकीय समस्या असल्यास रुग्णांना ही खेळणी वापरण्याचा सल्ला दिला जातो, परंतु किशोरवयीन मुले स्वतःच्या मर्जीने त्यांचा वापर करत आहेत.
डॉक्टर म्हणाले की, आता किशोरवयीन मुले ही खेळणी ऑनलाइन ऑर्डर करतात आणि त्यांचा वापर सुरू करतात. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रथम, ही खेळणी योग्य पद्धतीने वापरण्यास शिकलं पाहिजे आणि त्यांचे व्यसन लावून घेऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा संसर्ग आणि सूज येण्याचा धोका वाढू शकतो. तिसरे म्हणजे, त्यांचा अतिरेकी वापर किंवा गैरवापर करू नका. शेवटची गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे, ती म्हणजे या खेळण्यांचा दर्जा चांगला असावा. असे बरेच लोक आहेत जे या सेक्स टॉईजचा खूप वापर करतात आणि नंतर नैसर्गिकरित्या सेक्स करण्यात रस गमावतात. नैसर्गिक संबंध राखणं हे खेळण्यांपेक्षा थोडे वेगळे आहे. या खेळण्यांच्या मदतीने बरेच लोक अनैसर्गिक गोष्टी करायला लागतात, पण असं करू नये. या खेळण्यांचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, पालकांनी त्यांच्या मुलांना सेक्स टॉय भेट देण्यापेक्षा त्यांना लैंगिक शिक्षण देणे जास्त महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना त्याबद्दल योग्य गोष्टी कळतीलच, तसेच कोणतीही चुकीची कृती टाळण्यासही मदत होईल. मुलांशी लैंगिक आरोग्याबद्दल बोलणे ही वाईट गोष्ट नाही आणि त्यामुळे त्यांच्या चुकीच्या गोष्टी टाळण्यास मदत होऊ शकते. जे लोक लैंगिक व्यसनाला बळी पडतात किंवा त्याचं वेड लागतं, त्यांच्यासाठी ही खेळणी फायदेशीर ठरू शकतात जेणेकरून ते त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतील. जर तुम्हाला प्रजनन आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर अशी खेळणी वापरण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामुळे तुम्हाला योग्य माहिती मिळेल आणि तुमच्या आरोग्याला कोणताही धोका होणार नाही.
