दही, लिंबू आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!

पावसाळ्यात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या अडचणींवर मात करण्यासाठी आपण बर्‍याच प्रकारचे सौंदर्य उत्पादनांचा वापर करतोय.

दही, लिंबू आणि अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा 'हा' फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!
फेसपॅक

मुंबई : पावसाळ्यात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या अडचणींवर मात करण्यासाठी आपण बर्‍याच प्रकारचे सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो, परंतु तरीही विशेष काही चांगला परिणाम मिळत नाही. आपल्याला त्वचेच्या समस्या दूर करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय देखील केले पाहिजेत .ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. (Face pack of curd, lemon and apple cider vinegar is beneficial for the skin)

पावसाळ्यात चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण दही, लिंबू आणि अ‍ॅपल सायडर  व्हिनेगरचा फेसपॅक वापरू शकतो. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे दही, दोन चमचे लिंबाचा रस आणि चार चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्या. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा. त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्याला ही पेस्ट लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आणि बेसन पीठाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ आणि सहा चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट साधारण दहा मिनिटांसाठी फ्रीमध्ये ठेवा आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

हा फेसपॅक आपण आठ दिवसांमधून दोन वेळा लावला पाहिजे. चंदन आणि दुधाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे चंदन पावडर आणि तीन चमचे दुध घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यासोबत मानेला लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्यची समस्या दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Face pack of curd, lemon and apple cider vinegar is beneficial for the skin)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI