AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : टॅटू काढताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते!

टॅटू काढण्याची क्रेझ विशेषतः मुले आणि मुलींमध्ये दिसून येते आहे. टॅटू तुमचे व्यक्तिमत्त्व देखील बदलते. टॅटू काढल्याने स्टाईलिश लूक दिसतो. अनेक लोक फॅशनेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी टॅटू बनवतात. परंतु टॅटू काढल्यानंतर आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते.

Skin Care : टॅटू काढताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते!
टॅटू
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 7:53 AM
Share

मुंबई : टॅटू काढण्याची क्रेझ विशेषतः मुले आणि मुलींमध्ये दिसून येते आहे. टॅटू तुमचे व्यक्तिमत्त्व देखील बदलते. टॅटू काढल्याने स्टाईलिश लूक दिसतो. अनेक लोक फॅशनेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी टॅटू बनवतात. परंतु टॅटू काढल्यानंतर आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. टॅटू काढल्यानंतर पुरळ किंवा अॅलर्जी होण्याची शक्यता असते. टॅटू काढल्यानंतर नेमक्या कोणत्या टिप्स फाॅलो केल्या पाहिजेत. हे आपण बघणार आहोत. (Follow these tips after creating a new tattoo)

स्पर्श करू नका

टॅटू काढल्यानंतर मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्यास स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. जर तुम्ही नवीन टॅटू काढला असेल तर कोणालाही स्पर्श करू देऊ नका. जर कोणी नवीन टॅटूला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना योग्यरित्या सॅनिटायझ केल्यानंतर हात स्पर्श करण्याची परवानगी द्या.

पाणी

बऱ्याच लोकांना असे वाटते की, नवीन टॅटू जितका जास्त काळ पाण्यापासून संरक्षित असेल तितके चांगले. पण हा चुकीचा मार्ग आहे. आपण ते स्वच्छ करण्यासाठी सौम्य साबण वापरू शकता. टॅटूला पाणी लावले तरी काही प्राॅब्लेम होत नाही.

टॅटूवर क्रीम लावा

टॅटूला कोणत्याही प्रकारच्या संसर्ग आणि अॅलर्जीपासून सुरक्षित करण्यासाठी टॅटू क्रीम वापरा. ही क्रिम लावल्याने टॅटूवरील सुरक्षित राहते.

सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करा

नवीन टॅटू सूर्याच्या हानिकारक किरणांपासून दूर ठेवा. हे तुमच्या टॅटूचा रंग फिकट करू शकते. म्हणून, जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा टॅटूवर एसपीएफ 50 क्रीम लावा किंवा कोणतीही सनस्क्रीन लावा.

त्वचा खाजवू नका

जेव्हा नवीन टॅटू बनवला जातो. तेव्हा त्वचेला खाज येते. अशा परिस्थितीत, आपण टॅटू केलेल्या भागात एक ते दोन आठवडे खाजणार नाही याची काळजी घ्यावी. हे त्वचेला सोलून काढू शकते आणि आपण अशी चूक करू नये. अनेक वेळा ते टॅटूचा रंग बरोबर येत आहे की नाही हे पाहण्यासाठी देखील आपण असे करतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips after creating a new tattoo)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.