Skin Care : केळीची ‘ही’ पेस्ट चेहऱ्याला लावा आणि निरोगी त्वचा मिळवा!

कधीही सुंदर त्वचा मिळवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या क्रिम आणि साैंदर्य उत्पादने वापरण्यापेक्षा आपण घरगुती उपाय केले पाहिजे.

Skin Care : केळीची 'ही' पेस्ट चेहऱ्याला लावा आणि निरोगी त्वचा मिळवा!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 9:41 AM

मुंबई : सुंदर दिसायला कोणाला नको असत, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो. कधीही सुंदर त्वचा मिळवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या क्रिम आणि साैंदर्य उत्पादने वापरण्यापेक्षा आपण घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा कायमस्वरूपी सुंदर आणि चमकदार दिसण्यास मदत होते. (Get this banana paste on face and beautiful skin)

केळीची पेस्ट जर आपण दररोज सकाळी आपल्या चेहऱ्याला लावली तर आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला एक केळी आणि चार चमचे गुलाब पाणी लागणार आहे. ही पेस्ट घरी तयार करण्यासाठी केळी चांगली मॅश करून घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. या पॅकमुळे आपल्या चेहऱ्यावरील सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते. ही पेस्ट आपण आठ दिवसांमधून तीन वेळा लावली पाहिजेत. अर्धी केळी आणि तीन चमचे कोरफड लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये कोरफड मिक्स करून घ्या. यानंतर ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यासह मानेवर लावा.

तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा, हा खास फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल. केळीची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण केळीची साल वापरू शकता.

यासाठी 3 चमचे साखर, ओटचे पीठ, केळीच्या सालाची पूड घ्या. आता या तीन गोष्टी ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि कोरडे झाल्यावर पाण्याने धुवा. केळीच्या सालीमध्ये मध आणि हळद मिसळा. हे मिश्रण केळ्यासह चेहऱ्यावर घासून घ्या. 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर हे तसेच ठेवा. नंतर ते पाण्याने धुवा आणि एका कपड्याने चेहरा पुसा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Get this banana paste on face and beautiful skin)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.