Hair Care Tips: हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

Hair Care Tips: हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी
केसांची वाढ सुधारण्यासाठी तुम्ही कढीपत्ता सोबत आवळा आणि मेथीचा वापर करू शकता. यासाठी कढीपत्ता, आवळा आणि मेथी दाणे यांची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. सुमारे 30 मिनिटांनंतर ते धुवा. लक्षात ठेवा की धुण्यासाठी पाणी खूप थंड किंवा खूप गरम घ्यायचे नाही. त्यामुळे केसांच्या वाढीत फरक पडेल आणि ते निरोगीही राहतील.

हिवाळ्यात केस कोरडे होणे आणि पातळ होणे ही अतिशय सर्वसामान्य समस्या आहे. महिला आणि पुरूष दोघांनाही या त्रासातून जावे लागते. स्कार्फ, कँप नाही वापरले तर सर्दी होणार आणि ती वापरल्यावर केस तर रूक्ष होतात. अशावेळी आमच्या काही टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 03, 2022 | 9:47 PM

मुंबई : हिवाळ्यात केसाला संपूर्ण झाकले नाही तर थंडी तर वाजणारच. या दिवसात तुम्हाला डोक आणि कान झाकावे लागतात. स्कार्फ, कँप नाही वापरले तर सर्दी होणार आणि ती वापरल्यावर केस तर रूक्ष होतात. थंडीपासून स्वतःवा वाचवताना केसांना रूक्ष आणि नाजूक करणे जमणार नाही. अशावेळी आमच्या काही टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकतात.

जसे स्कार्फ किंवा लोकरची कँप वापरण्यापूर्वी आतून कॉटनचा कपडा बांधा. ज्याची लायनिंग लोकरीची नव्हे सूती असेल. असे केल्याने केस रूक्ष होत नाही आणि तुम्हाला सर्दी होणार नाही. बघा किती सोपे आहे. जोपर्यंत तुम्ही नीट माहिती घेणार नाही तोपर्यंत आपणच आपल्या केसांचे नुकसान करत राहू. त्यामुळे केसांची निगा राखण्याच्या टीप्स जाणून घ्या.

रात्री झोपण्यापूर्वी

हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी केस ( ब्रेड)बांधा. ब्रेड बांधताना केसांवर कॉटन स्कार्फ बांधून झोपा. असे करताना नीट झोप येत नसेल झोपण्यापूर्वी कॉटनची चादर ओढा आणि त्यावर रजई ओढा. हे केल्याने रजई तुमच्या रूक्ष केसांच शोषून घेणार नाही. आणि तुमचे केस रूक्ष होणार नाही.

हेअर सिरम

केस रूक्ष होण्यापासून स्वतःला वाचवायचे असेल तर हेअर सिरम अत्यंत उपयोगी आहेत. रात्री झोपण्यापूर्वी केसांना हेअर सिरम हळूवारपणे लावा. नंतर केसांची चोटी बांधा. आणि कॉटनचा स्कार्फ लावून झोपा. सकाळी तुमचे केस एकदम चकाकते आणि मऊ होतील.

गरम पाण्याने केस धुतल्यावर

हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुतल्यावर केस रूक्ष आणि पातळ झाली असे वाटतात. गरम पाणी केसांचा ओलावा आणि तेल काढून काढतात. त्यामुळे शँम्पू करण्यापूर्वी केसांना तेल जरूर लावा. सोबतच केसांसाठी एकदम कडकडीत पाणी घेण्याऐवजी जरा कोमट पाणी वापरा. हेअर ड्रायर वापरू नका.

बाहेर जाण्यापूर्वी हेअर जेल हवे

हिवाळ्यात केसांना खराब होण्यापासून वाचवण्यासाठी एक जरूर करा. बाहेर जाण्यापूर्वी केसांना हेअर जेल जरूर लावा. हेअर जेल तुमची हेअरस्टाईल तर खराब करतच नाही. केस मऊ ठेवता यामुळे केस रूक्ष होत नाही.

इतर बातम्या

Postpartum Care | बाळंतपणानंतरही पुन्हा सडपातळ व्हा, वजन नियंत्रणासाठी घरगुती उपाय

वेडिंग सीझन सुरू, या खास क्षणी त्वचेला उजळण्यासाठी उपाय काय? वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें