Postpartum Care | बाळंतपणानंतरही पुन्हा सडपातळ व्हा, वजन नियंत्रणासाठी घरगुती उपाय

Postpartum Care | बाळंतपणानंतरही पुन्हा सडपातळ व्हा, वजन नियंत्रणासाठी घरगुती उपाय
प्रातिनिधीक फोटो

आपल्याकडे गोड बातमी आहे हे स्त्रीला कळलं की तिचा आनंद गगनात मावत नाही. या 9 महिन्यात तिच्या शरीरात अनेक बदल होतात. अनेक हार्मोनल बदल्यामुळे महिलेचे वजन वाढतं. आणि बाळ झाल्यावर ती त्याच्या संगोपनात व्यस्त असते. त्यामुळे वाढलेल्या वजनाकडे ती दुर्लक्ष करते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jan 03, 2022 | 11:01 AM

मुंबई : आई होणं यापेक्षा मोठा आनंद नाही. पण महिला आपल्या फिगरच्या बाबतीत खूप जागृत झाल्या आहेत. त्या 9 महिन्यात महिलांचं वजन झपाट्याने वाढतं. मग प्रसूतीनंतर पहिलेसारखी फिगर प्रत्येक महिलेला हवी हवीशी वाटते. पूर्वी होणार कपडे परत घालता यावे अशी त्यांची इच्छा असते. हे वाढलेलं वजन परत कमी करता यावं यासाठी या गोष्टी करा आणि दिसा पहिलेसारखं सडपातळ आणि सुंदर.

आहारावर विशेष लक्ष द्या

बाळ आणि बाळंतीण त्याचं आरोग्य उत्तम राहवं यासाठी आईच्या आहारावर विशेष लक्ष दिलं जातं. मात्र त्यामुळे अनेक वेळा महिला सतत खात राहतात. अवेळी चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यामुळे वाढलेलं वजन अजून झपाट्याने वाढतं. म्हणून प्रसूतीनंतर महिलेने जेवणावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. हेल्दी आणि योग्य वेळी योग्य आहार घ्याची सवय महिलेने लावली पाहिजे. नाश्ता, दुपारचं जेवन आणि रात्रीचं जेवण हे व्यवस्थित घेतलं पाहिजे. वजन कमी करण्यासाठी नाश्ता किंवा जेवन सोडायचं नसतं.

व्यायाम करा आणि वजन घटवा

प्रसुतीनंतर आई बाळाच्या संगोपनात व्यस्त असते. अशावेळी ती स्व:तकडे लक्ष देत नाही. त्यामुळे गेल्या 9 महिन्यात वाढलेलं वजन अजून वाढू लागतं. पूर्वी होणारे कपडे आता होत नाही, हे पाहून या महिला वैतागलेल्या असतात. त्यामुळे बाळासोबतच या महिलेने स्व:ताची पण काळजी घेतली पाहिजे. तिने नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. या दिवसात योगाचा खूप फायदा होतो.

चालणं रामबाण उपाय

माणसाने फिट राहण्यासाठी रोज वॉक करणं गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठीच वॉक करा असं नाही. पण वॉक हे आरोग्यासाठी उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे प्रसूतीनंतर महिलेने रोज वॉक करावा. संध्याकाळी वॉक घेतल्यास याचा जास्त फायदा होतो.

सब्र का फल मीठा होता है

हो, या 9 महिन्यात वाढलेलं वजन परत कमी करण्यासाठी धीर ठेवणं खूप गरजेचं आहे. हे वजन सहजरित्या कमी होतं नाही. ही खूप लांबपर्यंत चालणारी गोष्ट आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही ठरवलेले रुटीन पाळणं खूप गरजेचं आहे. वजन अगदी लगेचच कमी होणार नाही. त्यामुळे तुम्हाला हताश न होता रुटीन पाळून धीराने सातत्य ठेवावं लागणार आहे.

‘या’ घरगुती टिप्स पण नक्की ट्राय करा

1. एक ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. नंतर ते पाणी कोमट करून दररोज प्या. 2. एक ग्लास पाण्यात दोन ते तीन लंवगा आणि दालचिनीचा एक तुकडा घालून ते उकळवा. आणि हे पाणी प्या. 3. रात्री एक कप कोमट दुधात, पाव चमचा जायफळ पावडर घालून दूध प्या. वजन कमी करणं हे चांगल आहे. पण मित्रीणींनो कुठलीही गोष्ट करताना एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

संबंधित बातम्या :

निरोगी आणि मजबूत केसांसाठी या 5 आयुर्वेदिक टिप्स फॉलो करा!

रात्री झोपताना त्वचेला ‘हे’ तेल लावा, चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर होतील!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें