AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंब्याचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या चुटकीत दूर करा!

आंबा खायला जवळपास सर्वांनाच आवडते. उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात.

आंब्याचा 'हा' फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या चुटकीत दूर करा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 7:16 AM
Share

मुंबई : आंबा खायला जवळपास सर्वांनाच आवडतो. उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, आंबा खाणे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नव्हेतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. (Mango face pack is beneficial for the skin)

आंब्याचा फेसपॅक आपण चेहऱ्याला लावला तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. एक आंबा घ्या आणि त्याचा लगदा काढा, दूध, गुलाबपाणी, चंदन पावडर त्यामध्ये मिक्स करा आणि बारीक पेस्ट करून घ्या. हा फेसपॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेला देखील लावा. साधारण वीस ते तीस मिनिटे हा पॅक आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर आपला चेहऱ्या कोमट पाण्याने धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळपटपणा, मुरूमाची डाग, पिपल्स आणि सुरकुत्या जाण्यास मदत होते. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे.

हा फेसपॅक तयार करताना हे लक्षात असूद्या की, दरवेळी आंब्याचा लगदा हा ताजाच असावा. आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.

आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. फिजिशियनच्यामते, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Mango face pack is beneficial for the skin)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.