फ्लॉवरची भाजी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याचे फायदे 

निरोगी आहार खाल तर, निरोगी राहाल हे ऐकले की बालपणातील अनेक आठवणी ताज्यातवान्या होतात! भाज्या खाण्याचे काय फायदे आहेत.

फ्लॉवरची भाजी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याचे फायदे 

मुंबई : निरोगी आहार खाल तर, निरोगी राहाल हे ऐकले की बालपणातील अनेक आठवणी ताज्यातवान्या होतात! भाज्या खाण्याचे काय फायदे आहेत, हे आपल्याला वेळोवेळी समजावले जात असत. सध्या भाजी मार्केटमध्ये, फ्लॉवर एक पौष्टिक भाजी नक्कीच सापडेल. फ्लॉवरमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी आहे आणि अँटी-ऑक्सिडेंट आणि इतर पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला फ्लॉवर खाण्याचे काही आर्श्चयकारक फायदे सांगणार आहोत. (cauliflower vegetable are extremely beneficial for health)

फ्लॉवरमध्ये शरीरासाठी फायदेशीर असणारं कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन आणि ऍन्टीऑक्सिडेन्ट आढळतात. 100 ग्रॅम फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन ‘सी’च्या दैनंदिन प्रमाणातील 77 टक्के, व्हिटॅमिन Kचे 20 टक्के असतात. त्याशिवाय लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनिज, फॉस्फरस, फॉलिक आणि पँटोथिक ऍसिड, व्हिटॅमिन बी 6 असतं.

एक वाटी फ्लॉवरमधील पोषक घटक

कॅलरी : 27

कार्बोहायड्रेट : 5.5 ग्रॅम

फायबर : 2 ग्रॅम

प्रथिने : 2 ग्रॅम

व्हिटामिन सी : 57% आरडीए

व्हिटामिन बी -6 : 14% आरडीए

फोलेट : 15% आरडीए

व्हिटॅमिन ई : 1% आरडीए

फ्लॉवरमध्ये अँटी-ऑक्सिडेंट घटक वयाचा प्रभाव कमी करण्यास आणि शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. जर आपल्याला आपल्या आहारामध्ये अँटी-ऑक्सिडेंट समृद्ध घटक समाविष्ट करायचे असतील, तर याच्या सेवनामुळे दाह कमी होतो, रक्तातील साखरेची पातळी कमी होते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

फ्लॉवरमध्ये शक्तिशाली आणि मजबूत अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे पेशींचे कार्य मजबूत करतात. फ्लॉवरमध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टीऑक्सिडेन्ट असतात, ज्यामुळे कर्करोगास कारणीभूत घटकांची प्रभावीता कमी होते. फ्लॉवरसह क्रूसीफेरस भाज्यांमध्ये असलेलं ग्लूकोसायनोलेट्स डीएनएला नुकसानापासून वाचवतात आणि पेशींचं आरोग्य चागंलं राखण्यास मदत करतात.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Milk Benefits | दररोज एक ग्लास गरम दूध सेवन करा, ‘या’ आजारांना दूर पळावा!

(cauliflower vegetable are extremely beneficial for health)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI