AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आतड्यांचे आरोग्य सुधारेल, रोगप्रतिकारशक्तीही वाढेल फक्त या एका छोट्याशा गोष्टीचे करा सेवन

धकाधकीच्या जीवनात लोकं निरोगी आणि तंदूरस्त राहण्यासाठी आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करत आहेत. तर तुमच्या आहारात या एका छोट्या गोष्टींचा समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायदे तुमच्या शरीराला होऊ शकतात. चला त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

आतड्यांचे आरोग्य सुधारेल, रोगप्रतिकारशक्तीही वाढेल फक्त या एका छोट्याशा गोष्टीचे करा सेवन
gut healthImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 02, 2026 | 10:54 PM
Share

सध्या धावपळीच्या जीवनशैलीत अनियमित खाण्याच्या सवयी आणि वाढता ताण यांचा आपल्या पचनसंस्थेवर म्हणजेच आतड्यांच्या आरोग्यावर सर्वात मोठा परिणाम होतोय. जेव्हा आपल्या पोटाचे कार्य बिघडते, तेव्हा त्याचे परिणाम केवळ पचनापुरते मर्यादित राहत नाहीत तर त्वचेच्या समस्या, अशक्तपणा किंवा वारंवार आजारपण यांसारख्या गोष्टींच्या रूपात ते संपूर्ण शरीरावर जाणवू लागते. यामुळे बहुतेकजण महागड्या सप्लिमेंट्स आणि औषधांचा आधार घेतात, पण या महागड्या गोष्टींचे सेवन करण्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक नैसर्गिक घटक उपलब्ध असतात जे सर्वांच्या आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित मानले जातात.

तर स्वंयपाक घरात असलेली ही एक लहान पण प्रभावी गोष्ट म्हणजे आवळा. आयुर्वेदात आवळ्याला अमृत फळ म्हटले जाते, कारण त्यातील व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे शरीराला आतून मजबूत करतात. या लेखात आपण दररोज एक आवळा खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य कसे चांगले राहते आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात.

आवळा पोषक तत्वांनी समृद्ध आहे

हेल्थलाइननुसार आवळा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए देखील आढळतात. एवढेच नाहीतर आवळा फायबर आणि खनिजांचाही एक उत्कृष्ट स्रोत आहे. आयुर्वेद तज्ञ सांगतात की दररोज एक आवळा खाल्ल्यानेही शरीराला असंख्य फायदे मिळतात. चला आवळ्याच्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घेऊया.

रोज एक आवळ्याचे सेवन आरोग्यासाठी ठरते फायदेशीर

तज्ञांच्या मते आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे. त्यात चांगल्या प्रमाणात फायबर असते, जे आतडे स्वच्छ करण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होतात आणि अन्नाचे पचन सुलभ होते. आवळा हा एक प्रकारे प्रीबायोटिक म्हणून काम करतो, ज्यामुळे आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंना प्रोत्साहन मिळते आणि आतड्यांचे आरोग्य उत्तम राखले जाते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते – आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. दररोज एक आवळा खाल्ल्याने सर्दी, खोकला, विषाणूजन्य संसर्ग आणि हंगामी आजारांशी लढण्यास मदत होऊ शकते.

पचनक्रिया सुधारते – दररोज आवळ्याचे सेवन केल्याने पोट स्वच्छ राहण्यास आणि अन्न सहज पचण्यास मदत होते. कारण आवळ्यामध्ये फायबर आणि एन्झाइम्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त आणि अपचन यांसारख्या समस्या कमी होतात.

त्वचा उजळते – आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढून सुरकुत्या, डाग आणि पिगमेंटेशन कमी करते. तसेच त्वचेमधील कोलेजन उत्पादनास चालना देऊन त्वचेला नैसर्गिक चमक आणि घट्टपणा देते.

केसांसाठी फायदेशीर – आवळा केसांची मुळे मजबूत करतो आणि केस गळणे कमी करतो. त्यासोबतच कोंड्याची समस्याही कमी करते आणि काळे, दाट व चमकदार केस वाढण्यास मदत करतो. आयुर्वेदात केसांसाठी आवळ्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

रक्तातील साखर नियंत्रित करते – आवळा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतो. ज्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि त्याच फायदा मधुमेही रुग्णांना होतो. मात्र मधुमेहींनी याचे सेवन केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केले पाहिजे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान...
बापरे! मनीषा मंधारेला प्रश्नपत्रिका तोंडपाठ अन्... चौकशीदरम्यान....
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
महागाईने मरा किंवा जय श्रीराम म्हणत गप्प बसा;राऊतांचा भाजपावर हल्लाबोल.
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता...
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील नाराजीनाट्यादरम्यान तिसरा नेता....
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला...
विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी कोणाला....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर.....
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....