AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेंदूतल्या नसांपर्यंत पोहोचला जीवघेणा Coronavirus, AIIMS मध्ये समोर आलं धक्कादायक प्रकरण

कोरोनाचा संसर्ग आता फक्त फुफ्फुसांवरच नाही तर शरीराच्या इतर भागावर आक्रमण करत आहे.

मेंदूतल्या नसांपर्यंत पोहोचला जीवघेणा Coronavirus, AIIMS मध्ये समोर आलं धक्कादायक प्रकरण
भूक, मनःस्थिती आणि झोपेसाठी महत्वाचे सेरोटोनिन हॉर्मोन
| Edited By: | Updated on: Oct 20, 2020 | 12:04 PM
Share

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या संसर्गाने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. मार्च महिन्यांपासून कोरोनाचा जसा धोका वाढला तशी त्याची लक्षणंही बदलत गेली. आता मात्र, कोरोना अधिक जीवघेणा झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा संसर्ग आता फक्त फुफ्फुसांवरच नाही तर शरीराच्या इतर भागावर आक्रमण करत आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये कोविडमुळे (Covid 19) कोविनाशिका नसा खराब झाल्या आहेत. (coronavirus damaging on brain nerve in child)

ही घटना एका 11 वर्षीय मुलीसोबत घडली आहे. त्यामुळे आता तिची दृष्टी कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. एम्सच्या बाल न्यूरोलॉजी विभागाचे डॉक्टर मुलीच्या आरोग्याचा सविस्तर अहवाल तयार करत असून लवकरच तो सगळ्यांसमोर आणला जाईल. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एका 11 वर्षाच्या मुलीमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तीव्र डिमिलिनेटिंग सिंड्रोम (ADS) आढळले आहेत. लहान मुलांमध्ये ही लक्षणं दिसण्याची ही पहिलीच घटना आहे.

बापरे! 9 महिन्याची गर्भवती महिला 5 मिनिटांत 1.6 किमी धावली, VIDEO पाहून हादराल

कोरोनामुळे मेंदूतल्या ज्या नसांमध्ये नुकसान झालं आहे त्याभोवती एक मायेलिन नावाच्या संरक्षक थर असतो. हा मेंदूतून शरीराच्या इतर भागापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम करतो. पण संसर्गातून तयार झालेलं एडीएस मायलीनचा नाश करतं, यामुळे मेंदूत सिग्नल पोहोचणं बंद होतं. यामुळे न्यूरोलॉजिकल किंवा मज्जासंस्थेच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन दृष्टी, स्नायू, मूत्राशय अशा अनेक अवयवांना मोठा धोका असतो.

एम्सच्या डिपार्टमेंट ऑफ पेडियाट्रिक्‍स डॉ. शेफाली गुलाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षांची ही मुलगी नजर कमकुवत झाल्याची तक्रार घेऊन आली होती. तिचा एमआरआय केला असता एडीएसबद्दल माहिती मिळाली. खरंतर, कोरोना विषाणूमुळे मेंदूत आणि फुफ्फुसांना नुकसान होतं, याची आम्हाला माहिती आहे. म्हणून यावर अधिक शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

तुमच्याकडे आहे ही 10 रुपयांची नोट तर लगेच मिळतील 25 हजार, वाचा कसे?

(coronavirus damaging on brain nerve in child)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.