नॉनव्हेजचा बेत करायचा, ‘हे’ आहेत मुंबईतील सर्वात स्वस्त 5 फिश मार्केट

Fish Markets in Mumbai : नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पण कोणत्या मार्केटमध्ये मासे स्वस्त आणि ताजे मिळतात अशा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे जाणून घ्या मुंबईतील स्वस्त फिश मार्केट

नॉनव्हेजचा बेत करायचा,  'हे' आहेत मुंबईतील सर्वात स्वस्त 5 फिश मार्केट
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 3:57 PM

मुंबई | 31 जानेवारी 2024 : नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मासे अनेकांना आवडतात. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, डॉक्टर देखील मासे खाण्याचा सल्ला देत असतात. मासे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. शिवाय अनेकांना याची चव विशेष आवडते. मुंबईमध्ये अनेक प्रकारचे मासे बाजारात विकण्यासाठी आहे. पण काही बाजारांमध्ये मासे फार महाग मिळतात. पण मुंबईत काही असे ‘फिश मार्केट’ आहेत जेथे फार कमी रुपयांमध्ये मासे मिळतात. तर आज जाणून घेवू मुंबईतील सर्वात स्वस्त ‘फिश मार्केट’बद्दल…

भाऊचा धक्का मुंबईतील सर्वात मोठं फिश मार्केट आहे. या बाजारात अनेक मासे प्रेमी मासे खरेदी करण्यासाठी येतात. भाऊचा धक्का या बाजारात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात मासे खरेदी करता येतात. या ठिकाणी खवय्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मासे सहजतेने आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात. सकाळी येथे माशांवर बोली देखील लागते. पहाटेपासून येथे व्यवहाराला सुरुवात होते. अनेक मासे विक्रेते देखील भाऊचा धक्का या फिश मार्केटमधून मासे विकण्यासाठी घेऊन जातात.

ससून डॉक : सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेला ससून डॉक सर्वात जुना आणि सर्वात मोठा फिश मार्केट आहे… ससून डॉकमध्ये अनेक प्रकारचे मासे उपलब्ध असतात. याठिकाणी मासे परवडणाऱ्या दरात मिळतात. मुंबईतील एक लोकप्रिय आणि जुने फिश मार्केट म्हणून ससून डॉकची ओळख आहे. जर तुम्हाला स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीचे मासे खरेदी करायचे असतील तर तुम्ही येथे नक्कीच भेट दिली पाहिजे.

हे सुद्धा वाचा

क्रॉफर्ड फिश मार्केट प्रचंड जुनं आणि प्रसिद्ध फिश मार्केट आहे. या बाजारात अनेक प्रकारचे मासे मिळतात. एवढंच नाही तर, क्रॉफर्ड फिश मार्केटमध्ये माशांचे दर देखील परवडणारे असतात. या ठिकाणी मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते.

सायन फिश मार्केट : सायन मार्केट मुंबईतील एक मासळी मार्केट ज्यामध्ये खेकडे देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही येथे कमी प्रमाणात मासे देखील खरेदी करू शकता. सायन मार्केटमध्ये देखील अनेक प्रकारचे मासे असतात.

दादर फिश मार्केट : मार्केट स्टेशनच्या अगदी जवळ आहे. दादर स्टेशनजवळ मोठं मार्केट आहे. याठिकाणी फळं, भाज्या आणि फिश मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मासे परवडणाऱ्या दरात असतात. रविवारी मासे खरेदी करण्यासाठी दादर फिश मार्केटमध्ये मासे प्रेमींची मोठी गर्दी जमते.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.