Heart Disease Risk : घरच्या घरी करा या टेस्ट, 90 सेकंदात कळेल तुमचे हृदय हेल्दी आहे की नाही

बर्‍याच लोकांना असे वाटते की हृदयविकार हा वृद्धत्वामुळे होणारा आजार आहे, म्हणूनच अनेक लोक वयाच्या 50-60 वर्षांपूर्वी हृदयाची तपासणी करत नाहीत. (Do this test at home, in 90 seconds you will know if your heart is healthy or not)

Heart Disease Risk : घरच्या घरी करा या टेस्ट, 90 सेकंदात कळेल तुमचे हृदय हेल्दी आहे की नाही
घरच्या घरी करा या टेस्ट, 90 सेकंदात कळेल तुमचे हृदय हेल्दी आहे की नाही

नवी दिल्ली : कोरोना महामारीने भारतासह जगभरात हाहाःकार माजवला आहे. परंतु जगात असे अनेक आजार आहेत ज्याबाबत आपण अजिबात बेफिकीर राहू शकत नाही. यापैकीच एक आजार आहे हृदयविकार. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सर्वाधिक मृत्यू हृदयरोगा(Heart disease)मुळे होतात. आपण घरच्या घरी सोपी टेस्ट करुन जाणून घेउ शकता की तुमचे हृदय निरोगी आहे की नाही. (Do this test at home, in 90 seconds you will know if your heart is healthy or not)

90 सेकंदात जाणून घ्या आपले हृदय निरोगी आहे की नाही

बर्‍याच लोकांना असे वाटते की हृदयविकार हा वृद्धत्वामुळे होणारा आजार आहे, म्हणूनच अनेक लोक वयाच्या 50-60 वर्षांपूर्वी हृदयाची तपासणी करत नाहीत. परंतु वास्तव हे आहे की हृदयरोग कोणत्याही वयात उद्भवू शकतो. मात्र आपण घरच्या घरी सोपी टेस्ट करुन जाणून घेउ शकता की तुमचे हृदय निरोगी आहे की नाही.

आपण 90 सेकंदांपेक्षा कमी वेळात 60 पायऱ्या चढू शकता?

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीनुसार आपण पायऱ्या चढण्याच्या चाचणीच्या सहाय्याने घरात फक्त 90 सेकंदात आपले हृदय निरोगी आहे की नाही ते जाणू शकता. डिसेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, ज्या लोकांचे हृदय निरोगी आहे ते फक्त 45 सेकंदात (climbing 60 stairs in 45 seconds) 60 पायर्‍या चढू शकतात. या अभ्यासामध्ये अशा प्रकारच्या 165 रुग्णांचा समावेश होता ज्यांच्यामध्ये कोरोनरी धमनी रोगाचा धोका होता.

45 सेकंदात 60 पायर्‍या चढल्यास हृदयविकाराने मृत्यूचा धोका कमी

या लोकांना प्रथम कठोर परिश्रम करण्याचा व्यायाम करण्यास सांगितले गेले आणि नंतर 15-20 मिनिटांच्या विश्रांतीनंतर त्यांना 60 पायर्‍या पटापट चढण्यास सांगण्यात आले. परंतु यावेळी कोणताही ब्रेक घ्यायचा नव्हता आणि धावायचेही नव्हते. सहभागींना शिडी चढण्यास लागणारा वेळ आणि त्यांची व्यायामाची क्षमता किती होती, या दोन्ही गोष्टी रेकॉर्ड केल्या गेल्या. 45 सेकंदात 60 पायऱ्या चढणाऱ्यांना हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी होता.

जर आपल्याला 90 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला तर डॉक्टरांना भेटा

जर आपल्याला 60 पायऱ्या चढण्यास 90 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला तर याचा अर्थ असा की आपले हृदय पूर्णपणे स्वस्थ नाही आणि आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा लोकांमध्ये मृत्यूचा धोका दरवर्षी 2 ते 4 टक्क्यांपर्यंत असतो. 60 पायऱ्या चढण्यास 90 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेणाऱ्या सुमारे 58 टक्के लोकांसाठी हृदयाचे कार्य असामान्य होते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने 2016 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, 45 टक्के हृदयविकाराचा झटका सायलेंट असतो. म्हणजेच यात कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. म्हणून आपल्या हृदयाची काळजी घेणे हे अधिक महत्वाचे आहे. (Do this test at home, in 90 seconds you will know if your heart is healthy or not)

इतर बातम्या

रशियात सिंगल डोसवाल्या ‘स्फुटनिक लाईट’ कोरोना लसीच्या वापराला मंजुरी, 80 टक्के परिणामकारकता असल्याचा दावा

मोठी बातमी! आता कोरोना चाचणी होणार आणखी वेगवान! RIL ने थेट इस्राईलच्या विशेष टीमला बोलावलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI