AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धने, जीरे, सुंठ आणि हळद आहारात जास्त घ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !

कोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

धने, जीरे, सुंठ आणि हळद आहारात जास्त घ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !
हेल्दी फूड
| Edited By: | Updated on: May 10, 2021 | 10:27 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज प्रत्येकजण विविध उपाय करताना दिसत आहे. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होईल. (Eat coriander, cumin and turmeric and boost the immune system)

सध्याच्या कोरोना काळात आपण अन्नात धने, जीरे, सुंठ, हळद आणि लसणाचा जास्तीत-जास्त वापर केला पाहिजे. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. धणे पावडर विशेषतः भारतीय खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते. बहुतेक सर्व घरांमध्ये हा एक सामान्य मसाला आहे. धणे खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. विशेष म्हणजे धन्याचे सेवन करून आपण अनेक आजारांना आपण दूर ठेऊ शकतो.

जिरेमध्ये लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि इतर अनेक घटक असतात जे युरीक अॅसिड नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात. यासह, त्यात बरेच अँटीऑक्सिडेंट्स आहेत जे युरीक अॅसिडमुळे होणारी जळजळ दूर करण्यात मदत करतात. जिरे केवळ व्हिटॅमिन ई भरलेले नाही तर त्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात. कच्च्या जिरेत थायमॉल असते जे एंजाइमला उत्तेजित करण्यासाठी आणि अशा प्रकारे पाचन रसांचे अधिक चांगले स्राव करण्यास ओळखले जाते.

हळद सूज कमी करण्यास, सर्दीची समस्या दूर करण्यासाठी, पाचन प्रणाली सुधारण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, रक्ताचे शुद्धीकरण आणि कर्करोगासारख्या आजारांविरुद्ध लढण्यास प्रभावी असते. हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप प्रतिबंधित करते. तसेच, हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकते.

लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते. शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा आहेत. लसूण फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच नाहीतर इतरही अनेक आजारांवर रामबाण आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Eat coriander, cumin and turmeric and boost the immune system)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.