लठ्ठपणा कमी करायचा आहे? मग कमी कॅलरीयुक्त ‘हे’ घटक आहारात घ्या !

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपली जीवनशैली बदली आहे. याचा परिणाम अनेकांचा वजनावर झाला आहे.

लठ्ठपणा कमी करायचा आहे? मग कमी कॅलरीयुक्त 'हे' घटक आहारात घ्या !
वाढलेले वजन

मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपली जीवनशैली बदली आहे. याचा परिणाम अनेकांचा वजनावर झाला आहे. वाढलेले वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी जवळपास सर्वचजण प्रयत्न करत आहेत. वजन कमी करण्यासाठी आपण आहारात काय खातो, हे अतिशय महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार आपण घेतला पाहिजे.  (Eat low calorie foods and lose weight)

वजन कमी करण्यासाठी आपण आहारात जास्तीत-जास्त कडधान्यांचा समावेश केला पाहिजे. यामध्ये सोयाबीन, बाजरी, ज्वारी, नाचणी, मुग, आणि ब्राऊड राईसचा आहारात समावेश केला पाहिजे. या कडधान्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे याचा समावेश आपल्या आहारात केल्यानंतर बराच काळ आपले पोट भरल्या सारखे वाटते. डाळ पचवणे खूप सोपे आहे. दररोज डाळ खाण्याने शरीर सक्रिय राहते.

डाळीमध्ये कमी प्रमाणात चरबी असते. यासह, खनिजे, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर समृद्ध डाळी असतात, जे पचन करण्यास उपयुक्त आहेत. डाळ खाल्ल्यानंतर पोट बर्‍याच वेळासाठी भरलेले राहते, त्यामुळे भूक जाणवत नाही. यामुळे वजन देखील वाढत नाही. एक कप डाळ खाल्ल्यास 18 ग्रॅम प्रथिने मिळतात. हे प्रोटीनचे एक उत्तम माध्यम आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यात कोलेस्ट्रॉल आढळत नाही.

मोड फुटलेले कडधान्य आपण आहारात घेतले पाहिजे. मोड फुटलेल्या कडधाण्यावर लिंबू आणि लाल मिरचीची पूड घालून आपण खाल्ले पाहिजे. वजन कमी करण्यासाठी आपण उपमा देखील आहारात घेऊ शकतो. त्यात प्रथिने भरपूर असतात. आपण सकाळी नाश्त्यामध्ये बेसन पीठाचे घावण देखील खाऊ शकतो. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. तंदुरुस्त राहण्यासाठी आपण अंडी खाऊ शकता.

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Eat low calorie foods and lose weight)