नाशपती खाल्ल्याने मधुमेहाचा धोका होतो कमी, जाणून घ्या त्याचे इतर फायदे !

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 22, 2021 | 3:21 PM

नाशपती हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या फळामध्ये खनिजे, जीवनसत्व आणि सेंद्रिय घटक असतात.

नाशपती खाल्ल्याने मधुमेहाचा धोका होतो कमी, जाणून घ्या त्याचे इतर फायदे !
नाशपती
Follow us

मुंबई : नाशपती हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या फळामध्ये खनिजे, जीवनसत्व आणि सेंद्रिय घटक असतात. हे फळ प्राचीन काळापासून एक औषध म्हणून वापरले जात आहे. याशिवाय यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन के, फिनोलिक कंपाऊंड, फोलेट, फायबर, तांबे, मॅग्नेशियम आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात. (Eating pears is beneficial for health)

वजन कमी करण्यासाठी नाशपती फळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जर आपल्या शरीरात फायबरची कमतरता असेल तर नाशपती आहारत घेतले पाहिजे.

पाचक प्रणाली नाशपतीचे सेवन केल्याने तुमची पाचक प्रणाली निरोगी राहते. हे पोटाशी संबंधित समस्या देखील दूर करते. यासह अतिसार आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

कर्करोग नाशपतींमध्ये अँटी कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात जे कर्करोग रोखण्यास मदत करतात. यात ब्रेस्ट सारख्या कर्करोगाचा समावेश आहे. नाशपतीमध्ये हायड्रॉक्सीनोमिक अॅसिड असते. हे पोटाचा कर्करोग रोखण्यास मदत करते.

प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी नाशपतीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन-सी असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांमध्येही हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

हृदयरोगासाठी नाशपतींमध्ये पोटॅशियम असते. हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या समस्या कमी करण्यात मदत करते.

अशक्तपणा नाशपतीमध्ये तांबे आणि लोह असते. हे शरीरात हिमोग्लोबिन वाढवते. याद्वारे, शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण होते. थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्यांसाठी देखील हे चांगले आहे.

हाडांसाठी नाशपतीमध्ये मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि तांबे असतात. यामुळे हाडे मजबूत राहतात. संधिवात देखील फायदेशीर आहे.

त्वचा नाशपातीमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेवरील वृद्धत्वाचे परिणाम कमी करते. यामुळे चेहऱ्यावर कमी डाग व सुरकुत्या होतात. हे आपल्या त्वचेसाठी चांगले आहे.

मधुमेह नाशपतीमध्ये फायबर असते. मधुमेह ग्रस्त लोकांसाठी हे एक चांगले फळ आहे. याव्यतिरिक्त, नाशपतीमध्ये नैसर्गिक साखर असते, जे मधुमेह ग्रस्त लोकांसाठी फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Health Tips :  हाडे नेहमी मजबूत ठेवायचीत? मग, आहारात नक्की सामील करा ‘हे’ 5 सुपरफूड्स

Health Tips | मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळवून देतील ‘हे’ पदार्थ! अशा प्रकारे करा सेवन

(Eating pears is beneficial for health)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI