AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : डाएटमध्ये आंब्याचा समावेश करताना ‘या’ टिप्स कटाक्षाने पाळा, वजनावर राहील नियंत्रण!

उन्हाळ्याची चाहुल लागली की, प्रत्येकजण आंब्याची वाट बघतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात.

Health Tips : डाएटमध्ये आंब्याचा समावेश करताना 'या' टिप्स कटाक्षाने पाळा, वजनावर राहील नियंत्रण!
आंबा
| Edited By: Chetan Patil | Updated on: May 20, 2021 | 9:59 PM
Share

मुंबई : उन्हाळ्याची चाहुल लागली की, प्रत्येकजण आंब्याची वाट बघतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. मात्र, आंबा खाल्ल्याने वजन वाढते, म्हणून अनेकजण आंबे खाणे टाळतात. मात्र, काही गोष्टी आपण कटाक्षाणे पाळून आंबे खाऊ शकतो. यामुळे आपले वजन देखील वाढणार नाही. (Follow these tips when including mango in your diet)

वर्कआउटनंतर आंबे खाऊ नका वर्कआउटनंतर शक्यतो आंबे खाणे टाळा. त्यात जास्त प्रमाणात कॅलरी असतात. जर तुम्हाला आंबे खायचे असतील तर वर्कआउट करण्यापूर्वी थोडा वेळ अगोदर खा. यामुळे आपले वजन देखील वाढणार नाही.

रात्री आंबे खाणे टाळा कधीही सकाळी किंवा दुपारी आंबे खाल्ले पाहिजेत. रात्रीच्यावेळी आंबे खाणे टाळाच, आंबे खाऊन झोपल्यावर वजन वाढण्याची शक्यता असते. यामुळे सकाळी किंवा दुपारी आंबे खा.

खाण्याचे प्रमाण ठरवा अनेकांना आंबे इतके आवडतात की, दिवसभर ते आंबेच खातात. मात्र, असे करणे देखील चुकीचे आहे. दिवसातून जास्तीत-जास्त पाच आंबे खा त्यापेक्षा अधिक आंबे खाणे टाळाच.

आंबे खाल्ल्याने ऊर्जा मिळते आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.

आंब्यामध्ये ए,बी जीवनसत्वे  आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Follow these tips when including mango in your diet)

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं