निरोगी राहायचं असेल, तर जेवणानंतर कटाक्षाने 'या' गोष्टी टाळा

जर तुम्हालाही निरोगी राहायचं (never do these after eating food) असेल, तर खाण्यापिण्याचे वेळेचे नियमित नियोजन करावे.

निरोगी राहायचं असेल, तर जेवणानंतर कटाक्षाने 'या' गोष्टी टाळा

मुंबई : दररोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या वेळा पाळणे कठीण झाले आहे. आपल्याला वेळ मिळेल त्यानुसार आपण हे सर्व करत (never do these after eating food) असतो. यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊन आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही निरोगी राहायचं (never do these after eating food) असेल, तर खाण्यापिण्याचे वेळेचे नियमित नियोजन करावे. तसेच कोणतीही गोष्ट खाल्ल्यानंतर काही गोष्टी करणे टाळावे यामुळे तुम्हाला फायदा (never do these after eating food) होईल.

जेवणानंतर ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा

अनेकदा जेवल्यानंतर आपल्याला आळस येतो आणि आपण झोपतो. पण जेवल्यानंतर झोपणे हे शरीरासाठी घातक असते. असे केल्याने तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. त्यासोबतच पचनासंबंधीचे काहीही आजारही होऊ शकतात.

अनेकदा आपल्याला सांगितले जाते जेवल्यानतंर एक तरी फळ खावे. पण जेवल्यानंतर लगेचच फळ खाणे हे शरीरासाठी घातक आहे. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार, जेवणासोबत फळ खाल्ल्याने तुम्हाला पोटाच्या तक्रारींचा सामना करावा (never do these after eating food) लागतो. त्यामुळे जेवल्यानंतर फळ खाऊ नये.

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अंघोळ करणे आणि योग्य आहार गरजेचा आहे. काही लोकांना जेवल्यानंतर अंघोळ करायला आवडते. मात्र यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. कारण खाल्ल्यानंतर अंघोळ केल्याने तुमच्या शरीरात रक्तप्रवाहाचा वेग वाढतो. त्याचा परिणाम पचन क्रियेवर होऊन ती थंडवते आणि यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

अनेक जण चहाचे फार शौकीन असतात. चहाची अनेकांना इतकी सवय होते की, अनेकजण जेवल्यानंतर लगेचच चहा पितात. मात्र यामुळे आपल्याला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. तसेच पचनासंबंधीचे काही आजारही तुम्हाला होऊ शकतो.

तसेच आपल्या आजूबाजूला अनेकांना जेवल्यानंतर सिगारेट ओढण्याची सवय (never do these after eating food) असते. जेवल्यानंतर सिगारेट ओढल्याने तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो.

जेवल्यानंतर प्रत्येकाला चालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आयुर्वेदानुसार, जेवल्यानंतर लगेचच चालणे हे घातक असते. त्यामुळे जेवल्यानंतर थोड्यावेळाने चालायला जावे. तसेच चालताना हळूहळू चालावे. यामुळे शरीराला पोषण मिळते आणि तुमची पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *