Immunity | रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मीठाचे सेवन कमी करावे लागेल? जाणून घ्या ‘किती’ मीठ खाणे ठरेल फायदेशीर

अन्नामध्ये अगदी कमी प्रमाणात मीठदेखील अन्नाची चव खराब करते, म्हणून मिठाशिवाय आयुष्याची कल्पना करणे अशक्य आहे. मीठ केवळ अन्नाची चवच सुधारत नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मीठाचे सेवन केल्याने आपल्याला शरीरासाठी आवश्यक सोडियम आणि क्लोराईड खनिजे मिळतात.

Immunity | रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मीठाचे सेवन कमी करावे लागेल? जाणून घ्या ‘किती’ मीठ खाणे ठरेल फायदेशीर
मीठ

मुंबई : अन्नामध्ये अगदी कमी प्रमाणात मीठदेखील अन्नाची चव खराब करते, म्हणून मिठाशिवाय आयुष्याची कल्पना करणे अशक्य आहे. मीठ केवळ अन्नाची चवच सुधारत नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मीठाचे सेवन केल्याने आपल्याला शरीरासाठी आवश्यक सोडियम आणि क्लोराईड खनिजे मिळतात. आपल्या शारीरिक कार्यासाठी सोडियम महत्त्वपूर्ण आहे आणि शरीरात द्रव संतुलन राखण्यासाठी क्लोराईड महत्त्वपूर्ण आहे (Immunity excess salt can affect on your immunity system).

परंतु, जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने रक्तदाब यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. आता एका नवीन अभ्यासानुसार, जास्त प्रमाणात मीठ घेणे देखील आपल्या प्रतिकारशक्तीसाठी धोकादायक ठरू शकते, असे सिद्ध झाले आहे.

मीठ आणि प्रतिकारशक्तीबद्दलचा अभ्यास काय म्हणतो?

सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसीनवर प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार, जर्मनीतील बॉनच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या संशोधकांच्या पथकाने एक अभ्यास केला. त्यात असे आढळले आहे की, आपल्या आहारात जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींचे बॅक्टेरियाविरोधी कार्य खराब होते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील धोकादायक जीवाणू आणि ई. कोलाई या जीवाणूला नष्ट करण्यास अक्षम आहे. बॅक्टेरियामुळे मूत्रपिंडात होणारे संक्रमण देखील होऊ शकते.

कशाप्रकारे केला अभ्यास?

संशोधकांच्या पथकाने त्यांना उंदरांचा अभ्यास करण्यासाठी लिस्टेरिया बॅक्टेरियाची लागण केली. त्यानंतर असे दिसून आले की, संक्रमित उंदरांची अवस्था ज्याला जास्त मीठयुक्त आहार देण्यात आला आहे. जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने शरीरातील ‘न्यूट्रोफिल’ नावाच्या रोगप्रतिकारक पेशी कमकुवत होऊ शकतात. जी प्रामुख्याने बॅक्टेरियातील मूत्रपिंडाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करते (Immunity excess salt can affect on your immunity system).

5 ग्रॅम मीठ शरीराला पुरेसे

WHO च्या मते, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात सोडियमची आवश्यकता पाच ग्रॅम मीठाने पूर्ण होते. परंतु आपल्यापैकी बरेच जण दिवसभरात सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ खातात. WHO च्या अभ्यासानुसार सर्वाधिक प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड, डेअरी आणि मांसमध्ये मीठ आढळले. WHO च्या म्हणण्यानुसार, मीठ समतोल प्रमाणात खाल्ल्यास जवळपास अडीच दशलक्ष मृत्यूंना आळा बसेल.

किती मीठ खावे?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज एक चमचे किंवा 5 ग्रॅम मीठ खावे. हे प्रमाणित प्रमाण आहे. मुलांसाठी हे प्रमाण कमी असेल. या व्यतिरिक्त, दररोज आवश्यक असलेल्या मीठाचे प्रमाण आपल्या शारीरिक हालचालींच्या पातळीवर देखील अवलंबून असते. हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

(Immunity excess salt can affect on your immunity system)

हेही वाचा :

Weight Loss | वजन कमी करण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ महत्त्वाचा! जाणून घ्या ‘4’ महत्त्वपूर्ण फायदे

Skin Care : चमकदार त्वचेसाठी बेसन पीठाचे ‘हे’ 5 फेसपॅक घरी तयार करा, होतील अनेक फायदे!