AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AC चं पाणी इन्व्हर्टरच्या बॅटरीत वापरणं योग्य आहे का? जाणून घ्या संपूर्ण सत्य

इन्व्हर्टर बॅटरीत एसीचं पाणी टाकणं धोकादायक ठरू शकतं! दिसायला जरी ते स्वच्छ वाटत असलं, तरी त्यामध्ये असलेल्या सूक्ष्म अशुद्धता आणि घातक घटकांमुळे बॅटरीचं नुकसान होऊ शकतं. मग नक्की कोणतं पाणी वापरावं आणि का? वाचा संपूर्ण माहिती.

AC चं पाणी इन्व्हर्टरच्या बॅटरीत वापरणं योग्य आहे का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
एसीचं पाणीImage Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Edited By: | Updated on: Jun 14, 2025 | 3:22 PM
Share

उन्हाळ्याचे दिवस आले की घराघरांत एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. कडक उन्हात एसीशिवाय एक क्षणही काढणं कठीण होऊन जातं. अनेकजण आजकाल ईएमआयवर एसी विकत घेत आहेत आणि आपल्या घरात थंडावा निर्माण करत आहेत. पण एसी वापरताना एक गोष्ट सर्वांनाच जाणवते म्हणजे एसीमधून वाहणारे पाणी. जेव्हा एसी घरातील गरम व दमट हवा आत ओढतो, तेव्हा त्यातील थंड कॉईल्स ही उष्णता आणि आर्द्रता शोषून घेतात आणि त्यामुळे वाफांचे पाणी तयार होते. हे पाणी नळाद्वारे बाहेर फेकले जाते. काहीजण या पाण्याला इकट्ठा करून इतर उपयोगांसाठी वापरत असतात.

अनेक घरांमध्ये हे पाणी जमा करून बागेत झाडांना पाणी घालण्यासाठी, पुसायला किंवा इतर घरगुती कामांसाठी वापरले जाते. मात्र, काही लोकांच्या मनात असा विचार देखील येतो की हे एसीमधून निघणारे पाणी इन्व्हर्टरच्या बॅटरीत वापरल्यास बॅटरीला अधिक चांगला फायदा होईल का? कारण डिस्टिल्ड वॉटर जसे शुद्ध असते तसेच हे पाणीही दिसते, म्हणून काही लोक हे धाडस करतात. पण खरेतर हा एक मोठा गैरसमज आहे.

डिस्टिल्ड वॉटर हे शुद्ध पाण्याचे प्रमाणिक स्वरूप असते, जे केवळ बॅटरीसाठी वापरणे सुरक्षित असते. यात कोणत्याही प्रकारची धूळ, जंतू, खनिजे किंवा रासायनिक प्रदूषके नसतात. यामुळेच ते बॅटरीच्या पेशींना कोणतीही हानी पोहोचवत नाही. पण एसीमधून बाहेर येणारे पाणी जरी दिसायला स्वच्छ वाटले तरी ते शुद्ध नसते. एसीच्या फिल्टरमध्ये जमा होणारी धूळ, हवेत असलेले सूक्ष्मजंतू, बॅक्टेरिया आणि इतर प्रदूषक यामध्ये मिसळलेले असतात. अशा स्थितीत हे पाणी जर बॅटरीमध्ये ओतले गेले, तर ते बॅटरीच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम करू शकते.

या अशुद्ध पाण्यामुळे बॅटरीच्या प्लेट्सवर गंज निर्माण होण्याचा धोका असतो. यामुळे बॅटरीची चार्जिंग क्षमता कमी होऊ शकते, तसेच तिची आयुष्यदेखील लवकरच संपुष्टात येऊ शकते. याशिवाय बॅटरीमध्ये असलेल्या इलेक्ट्रोलाइट्सची गुणवत्ता देखील बिघडते आणि कधी कधी शॉर्ट सर्किटसारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात. याचा थेट परिणाम म्हणजे बॅटरी वेळेआधीच खराब होण्याचा धोका.

म्हणूनच तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे की एसीमधून बाहेर येणारे पाणी केवळ घरगुती कामांसाठी किंवा बागकामासाठी वापरणे ठीक आहे, मात्र ते इन्व्हर्टरच्या बॅटरीत कधीही वापरू नये. बॅटरीसाठी केवळ प्रमाणित डिस्टिल्ड वॉटरचाच वापर करावा.

जरी काही वेळेस आर्थिक बचतीच्या नादात लोक हा पर्याय निवडतात, तरी दीर्घकाळात पाहता याचा आर्थिक तोटाच होतो. नवीन बॅटरी विकत घेण्याचा खर्च हा अशा चुकीच्या सवयींपेक्षा अनेक पटींनी जास्त असतो. म्हणूनच बॅटरीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी योग्य पद्धतीने देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.