हळदीचे डाग काढण्याच्या ‘या’ पाच सोप्या पध्दती… तुम्हाला माहितीयं का?

कपडे धुताना महिलांना दरवेळी एका समस्येचा हमखास सामना करावा लागत असतो. ती म्हणजे कपड्यांवर लागलेल्या हट्टी डाग... त्यात जर ते डाग तेलकट हळदीचे असतील तर, त्यासाठी गृहिणींना खुप मेहनत घ्यावी लागत असते. परंतु आज आपण काही घरगुती सोप्या पध्दतींव्दारे हे डाग कसे काढता येतील याची माहिती घेणार आहोत.

हळदीचे डाग काढण्याच्या ‘या’ पाच सोप्या पध्दती... तुम्हाला माहितीयं का?
कपड्यांवरील डाग काढण्याचे उपाय
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Apr 13, 2022 | 8:44 AM

कपड्यांवरील (clothes) काही डाग असे असतात, जे कितीही धुतले तरी सहजासहजी जात नाहीत. यात, तेलकट (Oily) पदार्थ, हळद, पेनाची शाई आदींचा समावेश असतो. यातील हळदीचा विचार केल्यास प्रत्येक खाण्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचा वापर केला जात असतो. असे पदार्थ खाताना ते कपड्यांवर पडल्यास तेलकट हळदीचे डाग आपली समस्या अधिक वाढवत असतात. या सोबत लग्नसराईमध्येही हळदीच्या दिवशी पांढर्या कपड्यांवर हळदीचे डाग (turmeric stains) उमटल्याने नंतर हे डाग काढण्यासाठी बराच आटापीटा करावा लागतो. अनेकदा नवे कपडेदेखील केवळ डाग पडल्याने घालता येत नसल्याच्या अनेक तक्रारी दिसून येतात. हे डाग काढण्याच्या नादात अनेकदा रासायनिक घटकांमुळे कपड्यांचा कापडही खराब होउन आजारापेक्षा इलाज महाग असच म्हणावं लागत असतं. त्यामुळे पुढील काही घरगुती पध्दतीने तुम्ही या समस्यांपासून स्वत:ची सुटका करु शकतात…

  1. 1) इंस्टेंट ट्रीट :जर कपड्यांना हळदीचा डाग लागला असेल तर, त्याला इंस्टेट ट्रीट करण्याची आवश्‍यकता आहे. मार्केटमध्ये मिळत असलेल्या लिक्विड डिटर्जेंटच्या माध्यमातून त्याला रब करुन घ्यावे. डागांवर लिक्विड डिटर्जेट टाकून झाकनाने त्याला रब करावे. त्यानंतर काही वेळेसाठी डागाला सूर्यप्रकाशात राहू द्यावे. ज्यावेळी तुम्ही कपडे धुवाल तेव्हा बर्याच प्रमाणात डाग गेलेले असतील.
  2. 2) टूथपेस्ट : हळदीचे डाग काढण्यासाठी टूथपेस्टदेखील फायदेशीर ठरु शकते. टूथपेस्टचा हा उपाय खूप कमी लोकांना माहिती आहे. हातात टूथपेस्ट घेउन डागांवर त्याला रब करा. काही वेळेसाठी त्याला तसेच राहू द्या. त्यानंतर मशीनमध्ये कपडे धुवावे. डाग कमी झालेले दिसतील.
  3. 3) व्हाईट व्हिगेनर : हेदेखील डागांच्या समस्सेवर परिणामकारक ठरते. दोन चमचे व्हाईट व्हिगेनरला लिक्विड डिटर्जेटमध्ये मिसळावे. त्यानंतर त्याला हळदीच्या डागांवर लावावे. 30 मिनट त्याला तसेच राहू द्या. नंतर गरम पाण्याने कपडे धुवावे.
  4. 4) लिंबू : लिंबूमुळे अनेक हट्टी डाग निघण्यास मदत होते. फार पूर्वीपासून लिंबूच्या रसाचा वापर केला जात आहे. अनेक कंपन्यादेखील आपल्या प्रोडक्टमध्ये लिंबूचा वापर करीत असतात. हळदीच्या डागावर लिंबूच्या रस टाकावा व त्याला रब करुन घ्यावे. त्यानंतर कपडे धुवावे.
  5. 5) गार पाणी : गार पाण्यामुळेदेखील हळदीचे डाग निघण्यास मदत होउ शकते. हळदीचे डाग लागलेले कपड्या गार पाण्यात भिजवा. त्यानंतर साधारणत: 30 मिनीटांनी त्यांना धुवावे.

संबंधित बातम्या : 

दररोज सकाळी जिमला जाण्याचा येतो कंटाळा? मग हे उपाय करा आणि घरीच आपले वजन कमी करा!

122 वर्ष जगणारी महिला रोज खायची ‘या’ 3 गोष्टी


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें