Health Tips: डोळे निरोगी ठेवायचे असतील तर आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा!

आजच्या काळात प्रत्येकजण संगणक, मोबाईल, टीव्ही इत्यादींचा बराच वापर करत आहे. या गोष्टींकडे दीर्घकाळ पाहिल्यास लहान वयात डोळ्यांचा त्रास होतो. डोळ्यांत पाणी येणे, डोळ्यात जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे, थकवा येणे या समस्या निर्माण होतात. बहुतेक लोक अनेक तास सतत स्क्रीनकडे बघून काम करतात.

Health Tips: डोळे निरोगी ठेवायचे असतील तर आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा!
आरोग्य
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 4:58 PM

मुंबई : आजच्या काळात प्रत्येकजण संगणक, मोबाईल, टीव्ही इत्यादींचा बराच वापर करत आहे. या गोष्टींकडे दीर्घकाळ पाहिल्यास लहान वयात डोळ्यांचा त्रास होतो. डोळ्यांत पाणी येणे, डोळ्यात जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे, थकवा येणे या समस्या निर्माण होतात. बहुतेक लोक अनेक तास सतत स्क्रीनकडे बघून काम करतात.

पण तुम्ही सतत 2 तास स्क्रीनकडे पाहत असाल तर ते तुमच्या डोळ्यांसाठी हानिकारक आहे. आजकाल कोविडनंतर मुलांचे शिक्षणही ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे मुलांच्या डोळ्याच्या समस्या वाढत आहेत. आपल्या शरीराला आणि मनाला वेळोवेळी विश्रांतीची गरज असते, त्याचप्रमाणे डोळ्यांनाही विश्रांतीची गरज असते. अशा परिस्थितीत डोळ्यांना विश्रांती देण्यासोबतच आहार चांगला असावा. ज्यामुळे डोळे निरोगी राहतील.

निरोगी डोळ्यांसाठी खाद्यपदार्थ

1- जर तुम्हालाही तुमचे डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवायचे असतील तर मधाचे रोज सेवन केले पाहिजे. खरे तर मध डोळ्यांसाठी नैसर्गिक गोडवा आहे. हे खाल्ल्याने फायदा होईल.

2- नारळ किंवा तिळाचे तेल रोज हलक्या हातांनी पायाच्या तळव्याला लावा. यामुळे तुमच्या डोळ्यांना फायदा होतो आणि प्रकाशावरही चांगला परिणाम होतो.

3- अन्नामध्ये प्रथिनयुक्त पदार्थांचा अधिक समावेश करा. डाळी आणि अंडी खा. मूग डाळीचे सेवन खूप फायदेशीर आहे. कारण ते डोळ्यांची दृष्टी वाढवते. यासोबतच हिरव्या भाज्या आणि कोशिंबीर खा, शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

4- आवळा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळा खाल्ल्यास डोळे चांगले राहतात. सकाळी रिकाम्या पोटी आवळाचा रस प्या. यासोबत आवळ्याच्या जामचेही सेवन करता येते.

5- गाजर डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. कारण त्यात असलेले बीटा कॅरोटीन डोळे निरोगी ठेवते. तुम्ही गाजराचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने डोळ्यांचे अनेक आजार दूर होतात. याशिवाय बदाम, अक्रोड यांसारख्या सुक्या फळांचा आहारात समावेश करा.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(If you want to keep your eyes healthy, include these things in your diet)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.