AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्भावस्थेदरम्यान ड्रायफ्रुट्स खाताय? आधी या गोष्टी लक्षात घ्या..

गर्भावस्थेदरम्यान महिलेच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात, ज्यामुळे तिला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो.

गर्भावस्थेदरम्यान ड्रायफ्रुट्स खाताय? आधी या गोष्टी लक्षात घ्या..
| Updated on: Apr 06, 2021 | 4:51 PM
Share

मुंबई : गर्भावस्थेदरम्यान महिलेच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात, ज्यामुळे तिला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत महिलेच्या शरीरात भरपूर पोषकद्रव्ये घेण्याची आवश्यकता असते. ड्रायफ्रुट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ड्रायफ्रूट्स हे पोषक तत्वांचा खजिना असल्याचे म्हटले जाते, परंतु गर्भवती महिलांनी ड्रायफ्रूट्स घ्यावे किंवा नाही याबद्दल अनेक लोकांच्या मनात शंका आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया. (Keep these things in mind while eating dry fruits during pregnancy)

जास्त करून महिला या गर्भावस्थेदरम्यान गरम गोष्टी खाणे टाळतात. भवतेक लोक ड्रायफ्रूट्स गरम असल्यामुळे गर्भावस्थेदरम्यान टाळतात. मात्र, ड्रायफ्रूट्स आपण रात्रभर पाण्यात भिजवल्यानंतर आपण ते खाऊ शकतो. यामुळे त्यांचा प्रभाव देखील कमी होतो आणि त्यामध्ये असलेली पोषक तत्त्वे देखील आपल्याला मिळतात, ज्यामुळे बाळाच्या चांगल्या वाढीस मदत होते.

ड्रायफ्रूट्स खाण्याचे फायदे

ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणाच जीवनसत्त्वे, खनिजे, अमीनो अॅसिडस्, फायबर असतात. याशिवाय, व्हिटॅमिन बी 1, बी 9, सी, ई, के, एच ​​इ अशा अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे ड्रायफ्रूट्समध्ये असतात. लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक फॉस्फरस यासारखे पौष्टिक पदार्थसुद्धा ड्रायफ्रूट्समध्ये आढळतात. हे खाल्ल्याने महिलेच्या शरीरातील रक्ताची समस्या दूर होण्यास मदत होते आणि अशक्तपणा दूर होतो. हाडांशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.

जर तुमचे वजन जास्त असेल तर आपण काजू सारख्या चरबी आणि साखरयुक्त ड्रायफ्रूट्स खाणे टाळावे नाहीतर वजन आणखी वाढू शकेल. फायबरच्या अधिकतेमुळे पोटात गॅस, सूज येणे इत्यादी कारणे उद्भवू शकतात, तर पोटॅशियमचे जास्त प्रमाण उच्च रक्तदाब होऊ शकतो. शक्यतो डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय ड्राय फ्रूट्सचे सेवन करू नका. जर आपल्या डाॅक्टरांनी ते खाण्यास अनुमती दिली असेल तर त्यातील प्रमाण ठरवा.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Keep these things in mind while eating dry fruits during pregnancy)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.