Weight Loss : वजन कमी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात!

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन बनवतात. वजन कमी करण्यासाठी आहारात कमी कॅलरीसह व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे.

Weight Loss : वजन कमी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात!
वेट लॉस

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन बनवतात. वजन कमी करण्यासाठी आहारात कमी कॅलरीसह व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. वजन कमी करायचे असेल तर आहाराची विशेष काळजी घ्या. मात्र, वजन कमी करण्याच्या नादामध्ये आपण बऱ्याच वेळा आहारामध्ये पोषण घटक कमी घेतो. हे आरोग्यासाठी हानीकारक आहे. (Keep these things in mind while losing weight)

1. नेहमी लक्षात ठेवा की वजन कमी करणे म्हणजे अतिरिक्त चरबी कमी करणे. याचा अर्थ असा नाही की आपण पौष्टिक पदार्थ खाणे बंद केले पाहिजे. म्हणून उपाशी राहू नका. बहुतेक लोकांना असे वाटते की भुकेले राहिल्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते आणि ही आपली सर्वात मोठी चूक आहे.

2. अशा गोष्टी खा ज्यामध्ये कॅलरी कमी आहेत. परंतु फायबर, प्रथिने आणि पौष्टिक पदार्थ जास्त खा. आपण आहारात कडधान्य, तीळ, सूर्यफूल, भोपळा समाविष्ट करू शकता. याशिवाय अक्रोड, काजू, बदाम, खजूर, मनुका इत्यादींचा समावेश आहारात करा. या गोष्टी चवदार तसेच खाण्यासही स्वादिष्ट आहेत.

3. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक आहारात भात खाणे टाळतात. परंतु तांदूळ पूर्णपणे खाणे बंद करणे योग्य नाही. पांढर्‍या तांदळाऐवजी तुम्ही लाल किंवा तपकिरी तांदूळ खाऊ शकता. हे आपणास भरपूर प्रमाणात कार्ब देईल जे उर्जेचे मुख्य स्त्रोत आहे.

4. हिरव्या भाज्या आणि फळांचा अन्नामध्ये समावेश करा. फळे आणि भाज्या पौष्टिक अन्नाचे नैसर्गिक स्त्रोत आहेत, म्हणून आपण वजन कमी करण्यासाठी आहारात याचा समावेश केला पाहिजे. आपल्या आहारात हर्बल, मसाला आणि ग्रीन टीचा समावेश करा. हे शरीरातून विषारी पदार्थ आणि मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यासाठी कार्य करते. म्हणूनच, नियमित चहाऐवजी आपण हर्बल, मसाला आणि ग्रीन टी घ्यावी.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Keep these things in mind while losing weight)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI