दुधामुळे तुमच्या चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो, जाणून घ्या…

त्वचा कोरडी पडण्याची समस्या आता सामान्य झाली आहे.

  • Updated On - 10:59 am, Tue, 23 March 21 Edited By: Anish Bendre
दुधामुळे तुमच्या चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो, जाणून घ्या...
फेसपॅक

मुंबई : त्वचा कोरडी पडण्याची समस्या आता सामान्य झाली आहे. परंतु, काही लोकांची त्वचा इतकी कोरडी होते की, त्यांच्या त्वचेवर मॉइश्चरायझरपासून बाजारात मिळणारी सर्वात महाग उत्पादने देखील फार काळ काम करत नाहीत. जर, आपल्यासोबतही असेच काही घडत असेल तर, आपणही घरगुती टिप्स करून पाहा. काही दिवसांत त्वचाही चमकदार दिसू लागेल. आपल्या त्वचेसाठी दूध अतिशय चांगले असते. त्वचेला दूध लावले तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. (Milk will give your face a natural glow)

दूध लावून चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये त्वचेवर अन्य कोणतेही प्रोडक्ट लावण्याची आवश्यकता नाही. मग तुमची त्वचा तेलकट असो किंवा कोरडी असो पण आपण जर हा उपाय रात्रीच्या वेळेस करणार असाल तर तेलकट त्वचा असणाऱ्यांनी त्वचेवर गुलाब पाणी आणि त्वचा कोरडी असल्यास आपण नाइट क्रीमचा उपयोग करावा. यामुळे त्वचेला अतिरिक्त पोषण तत्त्वांचा पुरवठा होईल आणि त्वचेतील पेशीही जलदगतीने दुरुस्त होतात.

तसंच सकाळी उठल्यानंतर तुमची त्वचा प्रसन्न आणि सतेज दिसेल. थोडी मसूर डाळ शुद्ध तुपात भाजून घ्या. यानंतर, डाळ दुधात भिजवून घ्या आणि ही डाळ चांगली भिजल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट किमान एक ते दीड तास चेहर्‍यावर लावा. चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला असताना, कुणाशीही बोलू नका किंवा हावभाव करू नका. अन्यथा, त्वचा सैल होईल. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. आपण दररोज हा फेस पॅक वापरू शकत नसाल, तर दोन ते तीन दिवसांनी पुन्हा चेहऱ्यावर प्रयोग करा. हा फेस पॅक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून पुन्हा वापरू शकता.

हे देखील लक्षात ठेवा :
-फेस पॅक / उठणे लावून तोंड धुल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.

-बर्‍याच वेळा त्वचेवरील मृत पेशी न निघाल्यामुळे देखील कोरडेपणाची समस्या वाढते. हे टाळण्यासाठी आठवड्यातून किमान दोन दिवस स्क्रब करा.

-रात्री झोपताना बदामाचे तेल कोमट करून चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी चेहऱ्यावर थोडा वेळ मसाज करा.

-एक चमचा लोणी आणि एक चमचा बदाम तेल व्यवस्थित मिक्स करा. या तेलाने आपल्या त्वचेवर आणि हाता-पायांवर हलका मसाज करा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने त्वचेची खोलवर मॉइश्चरायझिंगही होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Milk will give your face a natural glow)