यंदाच्या हिवाळ्यासाठी स्टाइलविषयी टिप्स हव्यात? चला तर मग जाणून घेऊयात

यंदाच्या हिवाळ्यात तुम्हाला फॅशनच्या बाबतीत सगळ्यांना पिछाडीवर टाकायचे असेल तर स्टाइलचे कोण कोणते पर्याय असू शकतात ते पाहूया

यंदाच्या हिवाळ्यासाठी स्टाइलविषयी टिप्स हव्यात? चला तर मग जाणून घेऊयात
clothes
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 17, 2021 | 7:43 AM

मुंबई : हिवाळा जवळ येतोय आणि आपण त्याची पूर्ण तयारी करायला हवी. हिवाळा उंबरठ्यावर आला आहे आणि गरमागरम कॉफी आणि रोमान्स यांच्या या हंगामामध्ये ट्रेंडी दिसायचं असेल तर त्यासाठी तयारी करायची वेळ आली आहे. मडाम कंपनीच्या डिझाइन हेड पारिका रावल यांनी या बाबत माहिती दिली आहे. यंदाच्या हिवाळ्यात तुम्हाला फॅशनच्या बाबतीत सगळ्यांना पिछाडीवर टाकायचे असेल तर स्टाइलचे कोण कोणते पर्याय असू शकतात ते पाहूया:

फरचा विचार करून बघा
तळपत्या उन्हाळ्यात फरचे कपडे घालण्याचा विचारही असह्य वाटेल. पण या अत्यंत फॅशनेबल कपड्यांचे निरनिराळे प्रयोग करण्याची संधी तुम्हाला हिवाळ्यामध्ये मिळू शकेल. फरपासून बनवलेले कोट आणि जाकेट हे पर्याय तुम्ही निवडू शकता. हे पर्याय नको असतील तर गळ्याभोवती गुंडाळण्यासाठी साधा फर स्कार्फ निवडू शकता.

लांब कोट नेहमीच खुलून दिसतात
तुम्ही कोणताही ड्रेस घालायचा ठरवला तरी चालेल, त्यावर एक सुंदरसा लांब कोट घातलात तर अधिक खुलून दिसाल. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे सॉलिड कलर निवडू शकता किंवा फ्लोरल निवडू शकता किंवा लेपर्ड प्रिंट ठरवू शकता. स्टायलिंगसाठी हा उत्तम पर्याय आहेच, शिवाय हिवाळ्यातल्या थंडीपासूनही तुमचं संरक्षण होईल.

स्वेटर वापरून निरनिराळे रंग परिधान करा
तुम्हाला हवा असलेला हटके व कॅज्युअल लूक मिळण्यासाठी स्वेटर हा सर्वात लोकप्रिय आणि स्टायलिश पर्याय आहे. हिवाळ्यामध्ये सैलसर स्वेटर घातला की आपल्या लाडक्या व्यक्तीच्या मिठीत असल्यासारखं वाटतं. इतकंच नाही, आणखी छान दिसण्यासाठी तुम्ही इंद्रधनुष्यासारख्या गडद रंगांचा वापर करू शकता. तुमच्याकडे निरनिराळे छान छान स्वेटर असायला हवेत.

निवांत दिवसासाठी लेयर्स
हिवाळ्यातल्या एखाद्या निवांत दिवशी गरमागरम कॉफीचा आस्वाद घ्यायचा, आणि याबरोबरच छान दिसणाऱ्या लेयर्सचा विचार करायला हरकत नाही. थंडीपासून बचाव होण्यासाठी, तसंच हटके दिसण्यासाठी तुम्ही ऊबदार शर्ट, स्वेटशर्ट आणि स्वेटर हे पर्याय विचारात घेऊ शकता.

लेदर जाकिट आणि डेनिम
लेदर जाकेट हा पर्याय कधीही कालबाह्य होणार नाही. हे जाकेट राकट दिसतात, शिवाय तुमचं रूप आणखी ऐटदार बनवतात. पार्टीला जायचं असेल किंवा रोड ट्रिपला जायचं असेल, रूबाबदार दिसण्यासाठी लेदर जाकेट हा सुंदर पर्याय आहे. याबरोबरच, या जाकेटवर डेनिम चांगली दिसेल. इतकंच नाही, तुम्ही डबल डेनिमचाही (जीन्स व जाकेट) विचार करू शकता. डेनिम परिधान कशी करायची, याचे वेगवेगळे प्रयोग करून पाहायला हरकत नाही.

फॉर्मल आणि फॅब
कामासाठी बाहेर जायचं असेल किंवा मित्रमंडळींबरोबर किंवा कुटुंबीयांबरोबर फिरायला बाहेर जायचं असेल; ऐटदार कोट, स्वेटर, टॉप आणि ट्राउझर हा पर्याय कधीच तुम्हाला निराश करणार नाही. तुम्हाला फॉर्मल कपडे आवडत असतील तर ते नक्की निवडा. लाल, गुलाबी किंवा पिवळा असे गडद रंग तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवू शकतात, पण प्लेन पांढरा किंवा काळा रंगही चांगला दिसू शकतो.

बूट्स वापरा
इतरांपेक्षा वेगळं दिसायचं असेल तर बूट हा नेहमीच उत्तम पर्याय ठरतो. आकर्षक बुटांमुळे तुमचे कपडे आणखी उठून दिसतात, शिवाय तुमच्यामध्ये एक आत्मविश्वासही दिसून येतो. यंदाच्या हिवाळ्यामध्ये गुडघ्यापर्यंतच्या लांब बुटांचा विचार करू शकता आणि त्यावरर लांब स्कर्ट घालू शकता. अँकल बूट किंवा मध्यम आकाराचे बूट असे अन्य पर्यायही तुमच्या कपड्यांबरोबर साजेसे दिसू शकतात.
वेगवेगळे सण, उशिरा चालणाऱ्या पार्टी आणि इतरही कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घ्या. म्हणूनच, हिवाळा सुरू होण्यापूर्वी मदामेच्या कलेक्शनमधून या निरनिराळ्या फॅशनची निवड करा.

हेही वाचा :

Ti Parat Aaliye | ‘ती परत आलीये’ म्हणजे ‘ती’ नक्की कोण आहे? लवकरच होणार ‘ती’चा पर्दाफाश

Ankita Lokhande Vicky Jain Wedding : अंकिता लोखंडे-विकी जैन लग्नबंधनात अडकले, पाहा शाही लग्नसोहळ्याचे खास फोटो!

Binge Watch : ‘स्पायडर मॅन’पासून ते ‘पुष्पा’पर्यंत, आठवडाभर मनोरंजनाची धमाकेदार मेजवानी!


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें