वजन कमी करताय? मग, आजच आहारात ओट्सचा समावेश करा…

नाश्त्याच्यावेळी बदाम, अक्रोड खाणे आरोग्यासाठी चांगले असते.

वजन कमी करताय? मग, आजच आहारात ओट्सचा समावेश करा...

मुंबई : नाश्त्याच्यावेळी बदाम, अक्रोड खाणे आरोग्यासाठी चांगले असते. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते. तसेच ओट्समध्ये भरपूर प्रथिने असतात. शिवाय ते पचनासही हलके असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी ओट्स खूप उपयुक्त असते. ओट्स हा आहारामध्ये सर्वोत्तम पर्याय आहे. ओट्स कोणत्याही वेळी खाता येऊ शकतात. अनेक जण सकाळी नाश्तामध्ये ओट्स खातात. (Oats are beneficial for weight loss)

विशेष म्हणजे ओट्स शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. चला तर मग जाणून घेऊयात ओट्स खाण्याचे फायदे….ओट्स हा प्रथिनेचा चांगला स्रोत आहे, तसेच त्यामध्ये बीटा ग्लूकेन्सदेखील आहेत. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. 100 ग्रॅम ओट्समधून 12 ग्रॅम प्रोटीन मिळते. साधारण 150 रुपये किलो असणारे ओट्स बाजारात सहज उपलब्ध होतात आणि ओट्स खाल्लाने तुमचे वजनही कमी होते.

ओट्समुळे पचनक्रिया सुधारते आणि वजनही नियंत्रणात येते. ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. ओट्स हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ओट्स सारखा चांगला नाश्ता दुसरा काहीही असू शकत नाही. जर आपल्याला कमी कॅलरी आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असा नाश्ता खायचा असेल तर ओट्स खाणे फायदेशीर ठरते. हे शरीरातील हानिकारक घटकांचा निचरा करते आणि आतडे निरोगी ठेवते. ओट्स खाल्ल्याने जास्त काळ भूक लागत नाही आणि वजन देखील नियंत्रणात राहते

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Oats are beneficial for weight loss)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI