AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचेसाठी ‘तांदळाचे पाणी’ फायदेशीर, वाचा फायदे…

जेवनामध्ये जवळपास सर्वच लोकांचा भात हा आवडता पदार्थ आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का? भात जेवढा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे.

त्वचेसाठी ‘तांदळाचे पाणी’ फायदेशीर, वाचा फायदे…
| Updated on: Mar 15, 2021 | 1:16 PM
Share

मुंबई : जेवनामध्ये जवळपास सर्वच लोकांचा भात हा आवडता पदार्थ आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का? भात जेवढा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. तेवढेच भाताचे पाणी देखील आपल्या आरोग्यासाठी आणि विशेष करून आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. मात्र, बर्‍याच वेळा भांड्यात भात शिजवताना उरलेले पाणी आपण टाकून देतो. मात्र, हे पाणी फेकण्याऐवजी रोजच्या आहारात समाविष्ट करा. याशिवाय केस आणि चेहऱ्यावर त्याचा उपयोग केल्याने बर्‍याच समस्यांपासून आराम मिळतो. चला तर मग याविषयी जाणून घेऊयात….(Rice Water is good for health)

-हे पाणी त्वचेसाठी चांगले क्लीन्झर आणि टोनर म्हणून देखील काम करते. सुरकुत्यापासून चेहऱ्याचे संरक्षण करते. यासाठी तांदळाचे पाणी कॉटन बॉलमध्ये घ्या आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवा.

-केस गळतीमुळे केस वाढत नाहीत किंवा इतर समस्या उद्भवत असतील, तर तांदळाचे पाणी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामध्ये असणारे अमीनो आम्ल केस गळण्यास प्रतिबंधित करतात. तांदळामध्ये व्हिटामिन बी, सी आणि ई आढळतात.

– तांदळाच्या पाण्यात भरपूर कार्बोहायड्रेट असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करतात. तसेच, शरीरास संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करतात.

-तांदूळाचे पाणी हे एक उत्तम कंडीशनर देखील आहे. शॅम्पूनंतर केसांवर ते कंडिशनर म्हणून वापरा. यामुळे केसांची लवचिकता आणि केसांची गुणवत्ता सुधारते.

-मुरुमांच्या समस्येमध्ये देखील तांदळाचे पाणी फायदेशीर आहे. हे मुरुमांचा लालसरपणा, सूज आणि खरुज काढून टाकते आणि नवीन मुरुमांना तयार होण्यापासून प्रतिबंध करते. रात्री झोपताना दररोज चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा.

-तांदळाचे पाणी बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते, पाचक प्रणाली सुधारते आणि चयापचय दर वाढवते.

संबंधित बातम्या : 

Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!

(Rice Water is good for health)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली