शू रॅकमधून येणारी दुर्गंधीवर या सोप्या घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
शू रॅकमधून येणारी दुर्गंधी ही प्रत्येक घरात एक सामान्य पण त्रासदायक समस्या असते. मात्र आम्ही दिलेले या काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकता.

आपल्या घरातील स्वच्छता ही केवळ घर झाडणं, पुसणं यापुरती मर्यादित नसते. अनेक वेळा घरातील एखाद्या भागातून येणारी दुर्गंधी तुमचा मूड बिघडवते आणि पाहुण्यांसमोर लाजही वाटते. अशातच, बहुतेकांच्या घरात एक ठरावीक जागा अशी आहे जी सतत वाईट वास देत असते आणि ती म्हणजे शू रॅक, म्हणजेच आपल्या चपला-जुते ठेवायची जागा.
शू रॅकमधून येणारी दुर्गंध ही केवळ वासापुरती मर्यादित नसते, तर ती तुमच्या घरातील वातावरणावर आणि मनःस्थितीवर देखील परिणाम करते. विशेषतः पाहुणे घरी आले असताना जर घरात पाऊल ठेवताच त्यांच्या नाकाला घाण वास जाणवला, तर ती लाजीरवाणी गोष्ट ठरू शकते.
या समस्येचं मुख्य कारण म्हणजे वापरलेले ओले किंवा घामाने भरलेले बूट-चपला जे रॅकमध्ये बंद राहतात. त्यामुळे त्यामध्ये नमी जमा होते आणि बॅक्टेरिया वाढतात, जे दुर्गंध निर्माण करतात. पण काळजी करू नका या दुर्गंधीवर मात करण्याचे काही सोपे घरगुती उपाय आहेत, जे तुम्ही आजपासूनच अमलात आणू शकता.
सर्वप्रथम, शू रॅकची नियमित सफाई करणे हे अत्यावश्यक आहे. आठवड्यातून एकदा तरी शू रॅक रिकामा करून त्यामध्ये साचलेली धूळ पुसा. त्यानंतर एक स्वच्छ मलमलचा कपडा घ्या आणि त्यावर थोडं सिरका किंवा लिंबाचा रस घालून रॅक स्वच्छ पुसा. हे नैसर्गिक क्लीनर असून त्यात अॅसिडिक गुणधर्म असतात जे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाचा नायनाट करतात.
दुसरा अतिशय उपयुक्त उपाय म्हणजे बेकिंग सोडा. एका छोट्या वाटीत बेकिंग सोडा घालून तो शू रॅकच्या कोपऱ्यात ठेवा. तो हवेमधील ओलावा आणि वास शोषून घेतो. तुम्ही हा सोडा एक कापडी पिशवीत घालून देखील ठेवू शकता. मात्र दर 15-20 दिवसांनी याची अदलाबदल करणे विसरू नका.
जर तुम्हाला शू रॅकमध्ये सुगंध दरवळावा असेल, तर तुम्ही काही एसेंशियल ऑइल्स वापरू शकता जसे की लॅव्हेंडर, टी ट्री, नींबूग्रास किंवा पुदिन्याचा तेल. एका कापसाच्या बोळक्यावर 2-3 थेंब टाका आणि तो शू रॅकमध्ये ठेवा. हे दुर्गंधी दूर करतं आणि वातावरणही प्रसन्न बनवतं. तुमच्याकडे जुना परफ्युम असल्यास तोही शू रॅकमध्ये ठेवू शकता.
शेवटी सर्वात महत्त्वाचं, कोरडे झालेले बूटच शू रॅकमध्ये ठेवावेत. बाहेरून घरी आल्यानंतर लगेचच ओले किंवा घामट बूट रॅकमध्ये न ठेवता, काही वेळ त्यांना उन्हात किंवा हवेत वाळू द्या.
या सोप्या उपायांचा अवलंब केल्यास तुमच्या शू रॅकमधील दुर्गंध कायमची दूर होईल आणि घरात आल्यानंतर सुगंधाने भरलेलं वातावरण तुमचं स्वागत करेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)