AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवासात होणाऱ्या मळमळ व उलटीपासून आराम देतील ‘हे’ नैसर्गिक उपाय

कार किंवा बसने प्रवास करताना काही लोकांना मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो. यामुळे केवळ प्रवासाची मजाच नाहीशी होत नाही, तर हे आरोग्यासाठी हानिकारक देखील मानले जाते. जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर आजच्या लेखात जाणून घेऊयात काही घरगुती उपाय आहेत जे मळमळीपासून आराम देतील.

प्रवासात होणाऱ्या मळमळ व उलटीपासून आराम देतील 'हे' नैसर्गिक उपाय
| Edited By: | Updated on: Apr 15, 2026 | 1:11 PM
Share

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना गाडीने प्रवास करायच म्हटलं की काहीस टेन्शन येतं. गाडीत किंवा बसमध्ये बसल्यावर थोडा वेळ झाला की मळमळ, उलटी होण्याच्या समस्या सुरू होतात. लांबचा प्रवास असो वा एखाद्या छोट्या अंतराचा या समस्येमुळे फिरण्याची मज्जा आनंद पुर्णपणे निघून जातो. हे सामान्यतः ‘मोशन सिकनेस’ म्हणून ओळखली जाते, शरीर आणि मन यांच्यातील संतुलन बिघडल्यामुळे ही समस्या काहींना उद्भवते. या समस्येवर उपाय म्हणून बरेच लोकं औषधोपचाराचा आधार घेतात. मात्र वारंवार औषधे घेणे हा प्रत्येकासाठी योग्य पर्याय नाही.

पण तुम्हाला काही सोपे आणि नैसर्गिक उपाय या समस्येपासून लक्षणीय आराम देऊ शकतात. जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर काही सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत जे तुम्हाला प्रवासातील मळमळीवर मात करण्यास मदत करू शकतात.

अदरकचे सेवन

प्रवासात तुम्हाला मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होत असल्यास, अदरकच्या सेवनाने आराम मिळू शकतो. त्यातील मळमळ कमी करणारे गुणधर्म पोटाला शांत करतात आणि उलट्या होण्याची शक्यता कमी करतात. तुम्ही प्रवासापूर्वी किंवा प्रवासा दरम्यान आल्याचा एक छोटा तुकडा चावू शकता किंवा आल्याचा चहा पिऊ शकता. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

लिंबू देखील आहे प्रभावी

उलटी थांबवण्यासाठी लिंबू देखील प्रभावी आहे. कारण लिंबूमध्ये ताजेतवाने करणारा सुगंध आणि आंबटपणा मळमळ त्वरित कमी करण्यास मदत करतात. प्रवास करताना आपल्यासोबत एक लिंबू ठेवा आणि जेव्हाही मळमळ जाणवेल, तेव्हा लिबांच रसाचा वास घ्या किंवा हलकेच एक दोन थेंब प्या. हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे.

पुदिन्याचाही प्रभाव दिसून येईल

पुदिना पोटाला आराम देतो आणि गॅस व उलट्यांपासून आराम मिळतो. प्रवासात तुम्ही पुदिन्याची पाने चावू शकता किंवा पुदिन्याचे पाणी पिऊ शकता. त्यांचा सुगंध मनालाही शांत करतो, ज्यामुळे मळमळ होत नाही.

लवंगांचे सेवन

लवंगामध्ये जंतुनाशक आणि मळमळ कमी करणारे गुणधर्म असतात, जे प्रवासात आराम देऊ शकतात. तुम्ही 1 किंवा 2 पानांचे सेवन करा. यामुळे उलट्या थांबण्यास आणि तोंडाची चव सुधारण्यास मदत होईल. तुम्ही हा उपाय देखील करून पाहू शकता.

वेलचीचे सेवन करा

तुम्ही प्रवासापूर्वी किंवा प्रवासा दरम्यान वेलचीचे सेवन करू शकता. वेलची पचनक्रियेस मदत करते आणि मळमळ कमी करते. प्रवासा दरम्यान एक किंवा दोन वेलची सेवन केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटण्यास आणि उलट्या होण्याचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....