AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tourist places of Maharashtra : महाबळेश्वर ते माथेरान, औरंगाबाद ते रत्नागिरी, टॉप 5 पर्यटन स्थळं

महाराष्ट्रातील पाच पर्यटन स्थळं, तिथे जाण्याचे मार्ग, आकर्षण बिंदू याविषयी थोडक्यात गाईड देणारा लेख

Tourist places of Maharashtra : महाबळेश्वर ते माथेरान, औरंगाबाद ते रत्नागिरी, टॉप 5 पर्यटन स्थळं
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 4:14 PM
Share

मुंबई : देशात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र कायमच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिला आहे. नैसर्गिक समृद्धीपासून तर अगदी भौगोलिक विविधतेसह वेगवेगळ्या संस्कृतींचा हा प्रदेश आपल्या वैविध्यामुळेच अनेक पर्यटकांना खुणावत असतो. महाराष्ट्रात जसा निसर्ग सौदर्याने भरभरून वाहणाऱ्या कोकणासाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो जगातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक बॉलिवूडचं शहर मुंबईसाठीही प्रसिद्ध आहे. आज आपण महाराष्ट्रातील पाच पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत. (Top 5 Tourist places of Maharashtra Mumbai Aurangabad Kolhapur Mahabaleshwar Ratnagiri)

1. मुंबई

प्रसिद्ध : ऐतिहासिक वास्तू, स्मारकं, शॉपिंग, खाद्यपदार्थ प्रमुख आकर्षण : मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी जवळची ठिकाणं : लोणावळा, खंडाळा, पुणे फिरण्यासाठी किती दिवस? 2-3 दिवस

कसं पोहचणार?

हवाईमार्ग : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं विमानतळ मुंबईत आहे. हे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल वाहतुकीसाठी खूप सोयीचं आहे.

रेल्वे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन मुंबईतील सर्वात मोठं स्टेशन आहे. या ठिकाणाहून देशभरात पोहचण्यासाठी रेल्वे गाड्या उपलब्ध असतात. विशेष म्हणजे मुंबईत शहरांतर्गत फिरण्यासाठी देखील या ठिकाणी मुंबई लोकलचं स्वतंत्र स्टेशन उपलब्ध आहे.

महामार्ग : दररोज 23 लाख प्रवाशांची वाहतूक करणारं उत्तम बस स्थानक मुंबईत आहे. या ठिकाणाहून राज्यातच नाही तर देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. विशेषतः तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या बसेसची संख्या मोठी आहे.

पर्यटन स्थळं :

गेट वे ऑफ इंडिया इलेफंटा केव्ह्ज मरिन ड्राईव्ह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हाजी अली दर्गाह संजय गांधी राष्ट्रीय उद्यान छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय ग्लोबल विपश्यना पॅगोडा सिद्धीविनायक मंदिर

2. औरंगाबाद

प्रसिद्ध : ऐतिहासिक वास्तू, स्मारकं प्रमुख आकर्षण : अजिंठा आणि वेरुळ लेणी, बिबी का मकबरा जवळची ठिकाणं : शिर्डी, नाशिक फिरण्यासाठी किती दिवस? 2 दिवस

कसं पोहचणार?

हवाईमार्ग : औरंगाबाद विमानतळ तिरुवनंतपुरम, बंगळुरु, मुंबई, हैदराबाद, तिरुपती आणि दिल्लीला कनेक्ट आहे.

रेल्वे : औरंगाबादमधील रेल्वे स्टेशन देशातील सर्व प्रमुख रेल्वे स्टेशनला कनेक्ट आहे. या ठिकाणी शहरात फिरण्यासाठी कुठूनही कॅबची व्यवस्था उपलब्ध आहे.

महामार्ग : या ठिकाणावरुन आंतरराज्यीय आणि शहरांतर्गत मोठ्या संख्येने बसेस उपलब्ध आहेत.

पर्यटनस्थळं :

अजिंठा लेणी वेरुळ लेणी देवगिरी किल्ला घृष्णेश्वर मंदिर खुलताबाद बिबी का मकबरा पानचक्की सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य जामा मशिद

3. कोल्हापूर

प्रसिद्ध : ऐतिहासिक वास्तू, स्मारकं, खाद्यपदार्थ, कोल्हापुरी चप्पल प्रमुख आकर्षण : महालक्ष्मी मंदिर जवळची ठिकाणं : रत्नागिरी, पणजी फिरण्यासाठी किती दिवस? 1 दिवस

कसं पोहचणार?

हवाईमार्ग : कोल्हापूरमध्ये विमानतळ नसलं तरी आजूबाजूला पुणे आणि मुंबई ही 2 विमानतळं कोल्हापूरला कनेक्ट आहेत. या विमानतळावरुन टॅक्सी घेऊन किंवा बसने प्रवास करता येतो. रेल्वे : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन देशातील सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनला जोडलेलं आहे. महामार्ग : कोल्हापूरला जाण्यासाठी आणि तेथून राज्याच्या इतर भागात जाण्यासाठी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत.

पर्यटनस्थळं :

महालक्ष्मी मंदिर जोतिबा मंदिर रंकाळा तलाव छत्रपती शाहू संग्रहालय पन्हाळा किल्ला

(Top 5 Tourist places of Maharashtra Mumbai Aurangabad Kolhapur Mahabaleshwar Ratnagiri)

4. महाबळेश्वर :

प्रसिद्ध : थंड हवेचं ठिकाण, निसर्ग प्रमुख आकर्षण : लिंगमाला धबधबा जवळची ठिकाणं : पुणे, वाई, खंडाळा फिरण्यासाठी किती दिवस?: 2 दिवस

कसं पोहचणार?

हवाईमार्ग : पुणे विमानतळ येथून सर्वात जवळ आहे. साधारण 3 तासाचं हे अंतर (121 किमी) आहे. रेल्वे : सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन सातारा येथील आहे. सातारापासून महाबळेश्वर दीड तासाच्या (56 किमी) अंतरावर आहे. हे स्टेशन देशातील सर्व प्रमुख स्टेशनला जोडलेलं आहे. महामार्ग : साताराहून या ठिकाणी जाण्यासाठी दरतासाला बसेसची व्यवस्था उपलब्ध आहे.

पर्यटनस्थळं :

प्रतापगड प्रताप गार्डन भवानी मंदिर

5. रत्नागिरी

प्रसिद्ध : अरबी समुद्र, बीच, आंबा प्रमुख आकर्षण : गणपतीपुळे जवळची ठिकाणं : कोल्हापूर, महाबळेश्वर फिरण्यासाठी किती दिवस? 1 दिवस

हवाईमार्ग : रत्नागिरीपासून पुणे विमानतळ 6 तासांच्या अंतरावर (304 किमी) आहे. रेल्वे : देशातील अनेक राज्यांमधून येणाऱ्य प्रमुख रेल्वेगाड्या रत्नागिरीतून जातात. महामार्ग : या ठिकाणाहून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यामुळे एसटी बसेसची पुरेशी उपलब्धता आहे.

पर्यटनस्थळं :

गणपतीपुळे मार्लेश्वर मंदिर गुहागर बीच रत्नागिरी लाईटहाऊस श्रीदेवी भागवती मंदिर

संबंधित बातम्या 

स्वस्तात मस्त, थंडीच्या सुट्टीसाठी भारतातील ‘या’ 5 राज्यांना नक्की भेट द्या!

Holiday Calendar 2021 | नव्या वर्षात सुट्ट्यांची रांग, पाहा कधी आणि किती दिवस ‘हॉलिडे’

(Top 5 Tourist places of Maharashtra Mumbai Aurangabad Kolhapur Mahabaleshwar Ratnagiri)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.