चेहऱ्यासाठी कॉफीचे हे फेसपॅक ठरतील फायदेशीर, वाढत्या वयातही तरूण दिसेल त्वचा
Coffee Face Packs For Anti Aging : वाढत्या वयाची लक्षणे चेहऱ्यावर दिसणे सामान्य आहे.त्यापासून वाचण्यासाठी कॉफीचा फेसपॅक उपयोगी ठरू शकतो.

Coffee Face Packs For Anti Aging : कॉफी (coffee) आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. ती चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या, त्रास कमी होतात. कॉफीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग गुणधर्म हे त्वचेला (skin) तरुण ठेवण्यास मदत करतात. कॉफी हे त्वचेतील रक्ताभिसरण (blood circulation) वाढवून त्वचा निरोगी ठेवते. अनेक वेळा त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा येतात आणि त्वचा वेळेपूर्वीच सैल होते. त्यामुळे व्यक्ती वेळेपूर्वीच वृद्ध दिसायला लागते.
अँटी-एजिंग समस्येसाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. पण ती महाग असतात, आणि त्याचा दरवेळी फायदा होतोच असं नाही. त्यात अनेक घातक केमिकल्सही असतात. अशावेळी त्वचा घट्ट करण्यासाठी आणि फाइन लाइन्स कमी करण्यासाठी कॉफीचा फेसपॅक उपयोगी ठरू शकतो. या पॅकमुळे त्वचेला पोषण मिळते तसेच त्वचाही चमकदार होतो. या पॅकमुळे त्वचेचे अतिनील किरणांपासूनही संरक्षण होते. अँटी एजिंगची समस्या दूर करण्यासाठी कॉफी फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.
1) कॉफी, हळद आणि दह्याचा फेसपॅक
1 चमचा कॉफी पावडर, 2 चमचे दही आणि पाव चमचा हळद हे सर्व एका बाऊलमध्ये एकत्र करा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावून 20 मिनिटे ठेवावे. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. थोड्या वेळाने साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवू टाका. यामुळे त्वचेचे पोषण होते व सुरकुत्याही कमी होतील.
2) कॉफी आणि मधाचा फेसपॅक
1 चमचा कॉफी पावडर, 1 चमचा मध आणि 1 चमचा दही हे सर्व एका बाऊलमध्ये घेऊन मिक्स करावे. ही पेस्ट चेहऱ्याला लावून 20 ते 30 मिनिटे ठेवावे. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. यामुळे त्वचा चमकदार होते तसेच ती सैलही पडत नाही.
हे फेसॅपक लावण्यापूर्वी एकदा पॅचटेस्ट जरूर करावी.
