AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू, उपासमारीमुळे गमावला जीव

मुंबईतील गोरेगावमधून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथील नेस्को एक्झिबिशन सेंटर मध्ये 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

धक्कादायक ! 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू, उपासमारीमुळे गमावला जीव
dogs (Represntative image)
| Updated on: Jul 29, 2024 | 1:00 PM
Share

मुंबईतील गोरेगावमधून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथील नेस्को एक्झिबिशन सेंटर मध्ये 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. NESCO एक्झिबिशन सेंटर गोरेगाव (पूर्व) च्या व्यवस्थापनाच्या सदस्यासह दोन व्यक्तींवर त्या परिसरात भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यापासून पशुखाद्यांना रोखल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे उपासमार होऊन तब्बल 26 कुत्र्यांचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अखेर याप्रकरणी नेस्को एक्झिबिशन सेंटरची महिला अधिकारी तसेच सुरक्षा रक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीना असे व्यवस्थापन सदस्य असलेल्या महिलेचे तर मौर्य असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. प्राणीप्रेमी मेहेक शर्मा यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केल्यावर अखेर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. आत सोडण्याची विनंती केली असता प्राणी प्रेमींना धमकावण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्राणीप्रेमींना कुत्र्यांना खायला घालण्यास करत होते मज्जाव

रिपोर्ट्सुनासर, मेहेक शर्मा व त्यांचे पती गेल्या वर्षभरापासून गोरेगाव नेस्को मैदान परिसरात 30 ते 40 भटक्या कुत्र्यांना खायला देत आहेत. मात्र, गेल्या 3 ते 4 महिन्यांत या दोन्ही आरोपींनी शर्मा यांना कुत्र्यांना खायला देण्यास मज्जाव केल्याने 20 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. “आम्ही या आजारी कुत्र्यांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला रुग्णवाहिका आत नेण्याची परवानगी दिली नव्हती,” असे शर्मा यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर शर्मा आणि इतरांनी नेस्को व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींना भेटण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हा आरोपींनी त्यांना पुन्हा कुत्र्यांना काहीही खाऊ घालण्यापासून रोखले. याप्रश्नी व्यवस्थापनाशी चर्चा करू, असे आश्वासन प्रतिनिधींनी दिले.

“दोन आरोपींनी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना नेस्को परिसरात कुत्र्यांना खायला देऊ दिले नाही आणि प्राण्यांप्रती क्रूरता दाखवली, त्यामुळे नेस्को परिसरात 26 कुत्र्यांचा मृत्यू झाला, असा दावा शर्मा यांनी एफआयरमध्ये केला आहे.

राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.