AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डी साईबाबा संस्थान कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी; कायम सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

शिर्डी साईबाबा संस्थानात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने कायम सेवेत रुजू करुन घेतलं आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं.

शिर्डी साईबाबा संस्थान कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी; कायम सेवेत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
| Updated on: Sep 10, 2024 | 6:07 PM
Share

साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस सोनेरी दिवस ठरलाय. कारण 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 2000 सालापर्यंतचे 1052 कर्मचारी 2004 साली कायम झाले होते. त्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर 598 कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा निर्णयल सरकारने घेतल्यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. 598 कर्मचाऱ्यांसोबत 2023 पर्यंत सेवेत 10 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कायम सेवेत घेतले जाणार आहे. रिक्त जागा तसेच पदोन्नतीची प्रकीया देखील पूर्ण करण्यात येणार असल्याने गणेश उत्सवातच कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होत आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “साईबाबांच्या शिकवणी प्रमाणे आम्ही काम करत गेलो. साईबाबांच्या आशीर्वादाने हा ऐतिहासिक निर्णय आम्हाला करता आला. कोण टीका करतंय, कोण गैरसमज पसरवतंय यात आम्ही वेळ घातला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने चालना दिली ते उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संस्थानची समिती आणि अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर विखे पाटील काय म्हणाले?

राधाकृष्ण विखे पाटील यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “प्रत्येक पक्षाच्या नेत्याला सभा घेण हे कामच आहे. ते शिर्डीत आले तर नवीन काय होणार आहे? त्याची खूप चर्चा करण्याची आवश्यकता नाही”, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.