‘नाम सुनकर फ्लावर समझा था क्या?’ नवनीत राणांची पुष्पा स्टाईल व्हायरल, म्हणाल्या झुकेगा नहीं….Video पाहिला का?
Navneet Rana Pushpa Style : भाजप नेत्या नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या पुष्पा स्टाईलची सध्या नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. झुकेगा नहीं...या त्यांच्या डायलॉगने विरोधकांना त्यांनी असं उत्तर दिलं आहे.

राज्याच्या भाजपा नेत्या नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर सध्या धुमाकूळ घालत आहे. दही हंडीच्या उत्सवात त्यांची पुष्पा स्टाईल देशभरात व्हायरल झाली आहे.अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटातील डायलॉग तुफान व्हायरल झाला आहे. त्याच स्टाईलमध्ये नवनीत राणा यांनी विरोधकांना थेट उत्तर दिलं आहे. राणा यांचा गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांची तोफ अजूनही आग ओकत असल्याचे त्यांनी या डायलॉगच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.
झुकेगा नहीं….
गेल्या रविवारी 18 ऑगस्ट रोजी कृष्णजन्माष्टमीनिमित्त अमरावतीत दही हंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवात नवनीत राणा आणि त्यांचा नवरा रवी राणा सहभागी झाले होते. त्यावेळी नवनीत राणा यांना पुष्पा आठवला. त्यांच्या बाजूला एक स्थानिक कलाकार पुष्पा स्टाईलने उभा होता. त्यावेळी नवनीत राणा यांनी विरोधकांना पुष्पा स्टाईलने उत्तर दिले.
“तुमच्यासारखे अनेक उखडून फेकले. नवनीत राणा हे काय घाबरणाऱ्यांचे नाव नाही. पुष्पा चित्रपटातील त्या डायलॉग प्रमाणे मी म्हणते, झुकेगा नही साला. नवनीत राणा नाम सुनकर सबको लगता है की, फ्लावर है, यह फ्लावर नहीं, फायर है फायर.” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आता त्यांचा हा इशारा नेमका कुणाला होता हे काही दिवसात समोर येईलच, अशी चर्चा आहे.
या एकाच व्यक्तीसमोर मानते
मंचावर पुष्पासारखा दिसणारा अजय मोहिते हा कलाकार होता. त्याच्याकडे पाहुन नवनीत राणा म्हणाल्या की, तुम्ही आता पुष्पाचा झुकेगा नहीं हा संवाद म्हणालात. मी लहानपणापासून असेच म्हणत आली आहे. मी केवळ एकाच व्यक्तीसमोर झुकले आहे, ते म्हणजे रवी राणा.
रवी राणाच्या विजयादिवशी पण पुष्पा स्टाईल
रवी राणा यांच्या पुष्पा स्टाईलची ही काही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हाच जलवा दाखवला होता. त्यावेळी महायुती बहुमताने निवडून आली होती. तर अमरावतीच्या बडनेरा येथून त्यांचे पती रवी राणा हे विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी डान्स केला होता. इतकेच नाही तर विरोधकांना इशारा दिला होता. ‘मेरा नाम नवनीत राणा है, झुकेगा नहीं साला.’ असा डायलॉग त्यांनी म्हटला होता.
