AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad: दिवसागणिक धाकधूक… 453 मतदार … अमरावती विधान परिषद रणसंग्रामात कुणाचा गेम होणार? कुणाला लॉटरी लागणार?

Legislative Council elections for Amravati Local Body Constituency: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरणही बदलले आहे. 453 मतदार या रणसंग्रामात कुणाचा गेम करणार आणि कुणाची लॉटरी लावणार हे लवकरच समोर येईल.

Vidhan Parishad: दिवसागणिक धाकधूक... 453 मतदार ... अमरावती विधान परिषद रणसंग्रामात कुणाचा गेम होणार? कुणाला लॉटरी लागणार?
कुणाचा गेम होणार? कुणाला लॉटरी लागणार? Image Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: May 20, 2026 | 10:35 AM
Share

Amravati Local Body Constituency Vidhan Parishad Election: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारंसघाच्या विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अमरावतीत रणधुमाळी सुरू आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच विविध पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात आता कोण बाजी मारते याची चर्चा सुरू असतानाच 453 मतदारांमध्ये कोण लोकप्रिय आहे हे सुद्धा यानिमित्ताने समोर येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कुणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता आणि चर्चा सुरू आहे.

भाजपला मविआकडून कुणाची फाईट?

अमरावती स्थानिक संस्था विधान परिषद निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपा तर्फे प्रवीण पोटे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. पण मविआकडून फाईटर कोण ? याची चर्चा रंगली आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरणातही बदल दिसून येत आहे.

प्रवीण पोटे पुन्हा मैदानात

तब्बल दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागेसाठी १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. सलग दोनदा भाजप तर्फे विधान परिषद आमदार असलेले प्रवीण पोटे यांनाच तिसऱ्यांदा भाजप संधी देऊ शकते, त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर काँग्रेस कुणाला उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपला होता. या मतदारसंघातून भाजपचे प्रवीण पोटे-पाटील यांनी २०१२ ते २०२४ या कालावधीत प्रतिनिधित्व केले आहे.

४५३ मतदार ठरवणार राजकीय भवितव्य

अमरावती स्थानिक संस्था विधान परिषद निवडणुकीत कुणाचे पारडे जड आहे याची चर्चा रंगली आहे. ४५३ मतदार उमेदवाराचे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत.महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आणि स्वीकृत सदस्यांचा यात समावेश आहे. राजकीय गणित पाहता भाजपकडे सुमारे १५० मतांचे बळ असल्याचे बोलले जात आहे. पण महाविकास आघाडी गेम फिरवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

महायुतीचे संभाव्य गणित

भाजप – १५०

शिंदे सेना – १८

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ३३

युवा स्वाभिमान – २६

प्रहार – २१

एकूण – २४८

महाविकास आघाडीचे संभाव्य गणित

काँग्रेस – १२०

शिवसेना (उद्धव ठाकरे) – २२

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ११

एकूण – १५३

निर्णायक भूमिका बजावणारे पक्ष

एमआयएम – १६

इतर – ३४

एकूण – ५०

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय