“येणाऱ्या 2024 मध्ये देशात मोठी क्रांती होईल”; भविष्यातील राजकारणावर भाजप नेत्याचं भाकीत…

महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Jan 22, 2023 | 7:13 PM

प्रकाश आंबेडकर ठाकरे गटाबरोोबर आघाडी करण्यावर त्यांनी खोचकपणे सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे कोणत्या गुणावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जात आहेत तेच मला माहित नाही अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

येणाऱ्या 2024 मध्ये देशात मोठी क्रांती होईल; भविष्यातील राजकारणावर भाजप नेत्याचं भाकीत...

अमरावतीः ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी त्यांनी गौरवोद्गगार काढले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच आज चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस आणि ठाकरे गटावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. जनतेची इच्छा असेल तर 2024 मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान व्हावं लागेल असा संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल गौरव केला होता.

त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी हे पंतप्रधान होण्यासाठी आणि त्याची संजय राऊत यांनी 2047 पर्यत वाट पाहावी लागेल असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

राहुल गांधी यांच्यावरून टोला लगावताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, येणाऱ्या 2024 मध्ये मात्र देशात मोठी क्रांती होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असा केलेला प्रवास आणि त्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे अनेक पक्ष आणि मान्यवरांनी राहुल गांधी यांच्यसोबत प्रवास केला.

दक्षिण भारते ते उत्तर भारताकडे प्रवास करत निगालेल्या भारत जोडो यात्रेमुळे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती.

त्याचमुळे संजय राऊत यांनी म्हटले होते की, 2024 मध्ये जनतेच्या इच्छेसाठी राहुल गांधी यांना पंतप्रधान व्हावं लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना सांगितले की, संजय राऊत आणि राहुल गांधी यांनी दिवस स्वप्न पाहणं बंद करावे कारण 2047 पर्यंत तर हे स्वप्न खरं होणार नाही असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीबाबत त्यांनी टीका केली आहे. ठाकरे गटाची आणि वंचितची युती होणार असेल तर आमचे काही म्हणणे नाही, मात्र उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या पक्षाचे आमदार त्यांना टिकवता आले नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर ठाकरे गटाबरोोबर आघाडी करण्यावर त्यांनी खोचकपणे सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे कोणत्या गुणावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जात आहेत तेच मला माहित नाही अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

उद्धव ठाकरे हे आपल्या पक्षातील आमदार सांभाळू शकले नाही तर घटक पक्ष कसे सांभाळू शकतील. त्यांच्यात ती क्षमता नाही. त्यामुळे वंचित कसा सांभाळतील अअशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

महाविकास आघाडीचे रोज रोज रंग बदलत आहेत त्यामुळे महाविकास आघाडी ही आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पुढच्या काळात त्यांना उमेदवार मिळणार नाही अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

तर वारंवार सुषमा अंधारे या शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करत असतात त्यांच्याविषयी प्रतिक्रिया काय असा सवाल केला असता ते म्हणाले की, सुषमा अंधारे या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही असा टोला अंधारे यांना लगावला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI