AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST Employees Strike | एसटी कर्मचाऱ्यांविरोधात सरकार आक्रमक, मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा

राज्य सरकारकडून एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यावर विचार सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर निर्णय घेतील, असा गर्भित इशारादेखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय.

ST Employees Strike | एसटी कर्मचाऱ्यांविरोधात सरकार आक्रमक, मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा
NAIL PARAB AND ST
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 10:50 PM
Share

मुंबई : एसटीच्या संपाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. अजूनही संप मिटत नसल्यामुळे आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी कडक कारवाई कण्याचा पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला बेकायदेशीर म्हटलं आहे. तसेच राज्य सरकारकडून एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यावर विचार सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर निर्णय घेतील, असा गर्भित इशारादेखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय.

सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत

तसेच अनिल परबांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. संप मिटविण्यासाठी आता संप मागे घेतला तरी जी कारवाई सरकारनं केलीय किंवा यापुढं कारवाई होईल ती कारवाई मागे घेतली जाणार नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत असल्याचंदेखील त्यांनी म्हटलंय.

मेस्मा कायदा काय आहे ?

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मेस्मा कायद्याअंतर्गत येतात. मेस्मा कायदा लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांना संप करता येत नाही. मेस्मा लावल्यावरही संप सुरुच ठेवल्यास अटक होण्याची शक्यता असते. दंडात्मक कारवाई किंवा जेलमध्येही पाठवलं जाऊ शकते. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचे हे आदोलन आगामी काळात खडतर असे ठरणार आहे.

गुरुवारी एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

दरम्यान, एकीकडे परब मेस्मा लावण्याबद्दल बोलत आहेत. तर तिकडे नांदेडमध्ये एसटीचे कर्मचारी आक्रमक झालेत. येथे संपादरम्यान दिलीप वीर यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गुरुवारी संपात सहभागी असताना दिलीप वीर यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रक्तदाब वाढल्यानं तसेच मेंदूत रक्तस्राव झाल्यानं डॉक्टरांनाही त्यांना वाचवता आलं नाही. या घटनेनंतर आपला सहकारी गेल्यानं आता एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आणखी संताप व्यक्त केलाय. असे असले तरी विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरु आहे.

इतर बातम्या :

‘पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर निशाणा

Nashik| सत्कार मागून मिळत नसतो, ठाले-पाटलांचे लिंबाळेंना प्रत्युत्तर; पुरस्कार मिळालेली पुस्तके चांगली असतातच असे नाही, असा टोला

Mpsc result : PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षा होणार 1 जानेवारी 2022 ला

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.