AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अंजली दमानियांच्या नव्या बॉम्बनं खळबळ, योगेश कदमांचं टेन्शन वाढलं

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री योगेश कदम यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे, त्यामुळे आता येत्या काळात कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! अंजली दमानियांच्या नव्या बॉम्बनं खळबळ, योगेश कदमांचं टेन्शन वाढलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 02, 2025 | 5:24 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सावली रेस्टॉरंटवरून मंत्री योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सावली रेस्टॉरंट हा डान्सबार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच वाळूच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप केला होता. त्यामुळे योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या, दरम्यान त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावतानाच अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान काही दिवसांपासून वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. यामध्ये योगेश कदम यांचं नाव देखील असल्याचं बोललं जातं होतं. मात्र कदम यांच्या राजीनाम्यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे,  टीका करून काम बंद करता येत नाही, राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे,  योगेश कदम यांनी चिंता करायचं काम नाही, असं शिंदे यांनी म्हटल्यानं या विषयाला सध्या पूर्णविराम मिळाला आहे.

मात्रा आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यामुळे कदम यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. दमानिया यांनी योगेश कदम यांच्याबद्दल बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.  सध्या मी बऱ्याच लोकांची माहिती काढत आहे,  राज्यात वाईट पद्धतीने सरकार चालत आहे. योगेश कदम यांच्याबाबतही प्रचंड माहिती माझ्याकडे आलेली आहे, आता जर ती सगळी माहिती मी बाहेर काढली तर चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे मी न्यायालयीन लढा देणार आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता कदम यांच्या अडचणी वाढणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान भाजप नेत्यांची वाजवायला मला सगळ्यात जास्त आवडलं असतं, पण त्यांच्याकडे चांगली खाती नाहीयेत, सर्व चांगली खाती राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाकडे आहेत, त्यामुळे त्यांच्या मंत्र्यांची प्रकरण बाहेर येत आहेत, असंही यावेळी दमानिया यांनी म्हटलं आहे.

मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.