औरंगाबादेत अपंग, अंथरुणावर खिळलेल्या नागरिकांसाठी लवकरच घरपोच कोरोना लस

अपंग, अपघातग्रस्त आणि आजारपणामुळे अंथरुणावर खिळलेल्या नागरिकांनी घरपोच कोरोना लस देण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिका घेण्याच्या तयारीत आहे.

औरंगाबादेत अपंग, अंथरुणावर खिळलेल्या नागरिकांसाठी लवकरच घरपोच कोरोना लस
सांकेतिक फोटो
दत्ता कानवटे

| Edited By: सागर जोशी

Jul 27, 2021 | 9:30 AM

औरंगाबाद : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना लस घेण्यासाठी औरंगाबादेतील अनेक केंद्रांवर मोठी गर्दी होत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक तार रांगेत उभं राहावं लागतं. त्यामुळे अपंग, अपघातग्रस्त आणि आजारपणामुळे अंथरुणावर खिळलेल्या नागरिकांनी घरपोच कोरोना लस देण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिका घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून तयारी सुरु असल्याची माहिती मिळतेय. (disabled and sick citizens will be vaccinated at home in Aurangabad)

केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार जिल्ह्यात 18 वर्षापासून पुढच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. मात्र, जिल्ह्यात अनेक लोक आजारपणामुळे, अपघातामुळे किंवा वयोमानामुळे लसीकरणापासून अद्याप वंचित आहेत. मात्र, लस न घेतलेल्या व्यक्ती कोरोना प्रादुर्भावासाठी हायरिस्क ठरु शकतात. दरम्यान, या लोकांना लसीकरण केंद्रावर घेऊन जाण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. अशावेळी औरंगाबाद महापालिका आता अशा नागरिकांना घरपोच लस देणार आहे. त्याबाबत आरोग्य विभागाची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

कचऱ्याच्या प्रश्नावरून एमआयएमचा आक्रमक पवित्रा 

मागील अनेक दिवसांपासून औरंगाबादेतील कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे. शहरात महत्त्वाच्या ठिकाणी कचरा साचत असल्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. याच कारणामुळे कचऱ्याच्या प्रश्नावरून एमआयएमने आक्रमक पवित्रा धारण केलाय. एमआयएमने शहरातील कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी केलीय. तसेच येत्या 24 तासांच्या आत पालिका प्रशासनाने कचऱ्याची विल्हेवाट लावावी अन्यथा पालिका प्रशासकांच्या घरापुढे आम्ही कचरा आणून टाकू असा इशारासुद्धा एमआयएमने दिला आहे. म्हणजेच एमआयएमने पालिका प्रशासनाला 24 तासांचे अल्टिमेटम दिले आहे.

इतर बातम्या :

शेततळ्यात दोघे पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृ्त्यू, औरंगाबाद हळहळलं

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश, गुंगीचे भस्म देऊन लूट, दोन भोंदूबाबांना अटक

disabled and sick citizens will be vaccinated at home in Aurangabad

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें